मुलींचा जन्मदर वाढतोय; अकोल्यात ‘बेटी बचाओ’ला यश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:21 AM2021-09-21T04:21:28+5:302021-09-21T04:21:28+5:30
हजार मुलांमागे मुली किती? २०१७ - ९०५ २०१८ - ९११ २०१९ - ९२४ २०२० - ९५६ २०२१ - ...
हजार मुलांमागे मुली किती?
२०१७ - ९०५
२०१८ - ९११
२०१९ - ९२४
२०२० - ९५६
२०२१ - ९४९
पाच वर्षांपासून जन्मदराचा आलेख वाढता
मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्मदराचा आलेख वाढताच दिसून येत आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये हजार मुलांमागे ९०५ मुलींचा जन्म झाला होता. हेच प्रमाण चार वर्षांत २०२० मध्ये हजार मुलांमागे ९५६ झाले होते, तर चालू वर्षात सद्य:स्थितीत हजार मुलांमागे ९४९ असून ते आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लिंग निदानास बंदी
प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान करणे ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य होताना आढळल्यास १८००२३३४४७५ या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवून शकता. माहिती देणाऱ्यास बक्षीस योजनेअंतर्गत एक लाखापर्यंत बक्षीस दिले जाईल.
जिल्ह्यात मुलांच्या जन्मदराची स्थिती सुधारत आहे. मागील पाच वर्षांत मुलांच्या जन्मदराचा आलेख वाढत आहे. लिंग निदानास बंद असून, असे करणाऱ्यांवर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. आपल्या जवळपास असे होत असल्यास माहिती कळवावी. माहिती देणाऱ्यास शासनातर्फे बक्षीस दिले जाईल.
- डॉ. वंदना पटोकार (वसो), जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला