सर्वत्र ठणठणाट; पण कोरडवाहू प्रक्षेत्रावर पाणी!
By admin | Published: November 23, 2014 01:14 AM2014-11-23T01:14:46+5:302014-11-23T01:16:44+5:30
साठ टक्के पाण्याची बचत; डॉ.पंदेकृविचे प्रक्षेत्र फुलले.
अकोला : यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वच ठिकाणी ठणठणाट असताना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कोरडवाहू संशोधन केंद्राचे प्रक्षेत्र फुलले आहे. या प्रक्षेत्रावरील दोन तळय़ात नियोजनबद्ध पद्धतीने पाणी साठवण्यात आले असून, विना वीज तसेच इतर सूक्ष्म सिंचनाद्वारे साठ टक्के पाण्याची बचत करण्यात येत असल्याने, या प्रकल्पाला बघण्यासाठी शेतकर्यांची वर्दळ वाढली आहे.
जिल्हय़ात सरसरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विद्या पीठातील मध्यवर्ती संशोधन केंद्र व इतर प्रक्षेत्रावर पाण्याची सोय नसल्याने रब्बी हंगामातील पिके घेणे कृषी विद्यापीठाला दुरापास्त झाले आहे. या कृषी विद्यापीठाला मिळणारे मोर्णेचे पाणी बंद झाल्याने कृषी विद्यापीठाचे शरद सरोवरासह इतर सर्वच तळे कोरडे पडले आहेत. पण कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू प्रक्षेत्रावरील रानं बहरले असून, या प्रक्षेत्रावर सीताफळ, पपई, हनुमानफळ इतर फळ पिके तर आहेतच; शिवाय भाजीपाला पिकांसह प्रात्यक्षिक पिकेही आहेत.
विदर्भातील कोरडवाहू शेतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी विद्या पीठात कोरडवाहू संशोधन केंद्र उभारले आहे. या केंद्रावरील शे तीमध्ये कोरडवाहू पिकांचे विविध संशोधन केले जात असून, या संशोधनाचे जे निष्कर्ष निघतात, त्या निष्कर्षांंची शिफारस विदर्भा तील शेतीसाठी केली जात आहे.
या प्रक्षेत्रावर दोन तळे बांधण्यात आले असून, एका तळ्य़ाचा आकार ५0 बाय ३0 मीटर आहे. या तलावाची खोली ३ मीटर असून, या तळ्य़ाच्या १00 फूट अंतरावर खालच्या बाजुला दुसरे १८ बाय १२ मीटर आकाराचे तळे बांधले आहे. या तळ्य़ाची खोली ३ मीटर आहे. मोठय़ा तळ्य़ातील पाण्याचा विसर्ग लहान तळ्य़ात साठल्या जावा, अशी या तळ्य़ाची रचना आहे. या दोन्ही तळय़ातील पाण्याचा वापर सूक्ष्म पद्धतीने केला जात असून, या ठिकाणी अतिसूक्ष्म ड्रिप्स संच लावले असून, अतिसूक्ष्म आणि सूक्ष्म या दोन पद्धतीचे तुषार सिंचन संच लावले आहेत. या सर्व सूक्ष्म सिंचन प्रकल्पाचे २0 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिक आहे. तसेच विना विजेच्या पायडल पंपाद्वारे या प्रक्षेत्रावर सिंचन व्यवस्था उभारण्यात आली आहे. अतिसूक्ष्म ड्रिप्सद्वारे (मायक्रो ड्रिप्स) या प्रक्षेत्रावर मेथी, पालक, वांगे व इतर पिके घेतली जात आहेत. प्रा त्यक्षिकासाठी लावलेल्या कापूस पिकाला या तळ्य़ातून तुषार संचाद्वारे पाणी देण्यात येत आहे.