भाजपकडून जिल्हाभरात वीज बिलाची हाेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 11:25 AM2020-11-24T11:25:08+5:302020-11-24T11:25:27+5:30

Akola BJP News साेमवारी भाजपच्यावतीने जिल्हाभरात आंदाेलन पुकारण्यात आले हाेते.

BJP Burns electricity bills in the district of Akola | भाजपकडून जिल्हाभरात वीज बिलाची हाेळी

भाजपकडून जिल्हाभरात वीज बिलाची हाेळी

Next

अकाेला: काेराेना साथीच्या कार्यकाळातील भरमसाट वीज देयक माफ न करता ग्राहकांजवळून वसूल करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विराेधात साेमवारी भाजपच्यावतीने जिल्हाभरात आंदाेलन पुकारण्यात आले हाेते. शहरात गाेरक्षण राेडस्थित महापारेषण कार्यालयासमाेर केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धाेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी वाढीव वीज बिलाची हाेळी केली.

काेराेना विषाणूच्या साथीत अनेक माेठमाेठे उद्याेग, व्यवसाय काेलमडले. खासगी क्षेत्रातील अनेकांवर नाेकरी साेडण्याची वेळ आली. हातावर पाेट असणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे चित्र हाेते. काेराेनाची झळ लक्षात घेता काेराेना काळातील वीज देयक राज्य सरकारकडून माफ केले जाईल, अशी अपेक्षा हाेती. ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी तसे संकेतही दिले हाेते. नंतर काेठे माशी शिंकली देव जाणे. महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना पाच-पाच महिन्यांच्या कालावधीतील भरमसाट देयकांचे वाटप करून देयक जमा करण्यासंदर्भात दबाव निर्माण करण्यात आला. काेराेनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असताना राज्य शासन यासंदर्भात ठाेस निर्णय घेत नसल्याचा आराेप करीत साेमवारी जिल्हाभरात भाजपच्यावतीने वीज बिलांची हाेळी करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धाेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर, ज्येष्ठ आ. गाेवर्धन शर्मा, महापाैर अर्चना मसने, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी वीज बिलांची हाेळी केली. गाेरक्षण राेडस्थित महापारेषण कार्यालयासमाेर तसेच रेल्वे स्टेशन चाैक, जय हिंद चाैक आदी भागात झालेल्या आंदाेलनात भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आदी सहभागी हाेते.

 

प्रत्येक तालुक्यात आंदाेलन

वाढीव देयक माफ करण्याची मागणी लावून धरत भाजपच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच काही गावांमध्ये वीज देयकाची हाेळी करण्यात आली. काेराेना विषाणूच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाला असून, यावर शासनाने ठाेस निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: BJP Burns electricity bills in the district of Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.