Akola: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप कटिबद्ध, चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 03:45 PM2023-09-03T15:45:59+5:302023-09-03T15:46:53+5:30
Maratha Reservation : शरद पवार,उध्दव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारच्या काळात मराठा आरक्षण टिकू शकले नाही,पण भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
अकाेला - शरद पवार,उध्दव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारच्या काळात मराठा आरक्षण टिकू शकले नाही,पण भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. अकोला लोकसभा मतदार संघातील पश्चिम व पूर्व अकोला तसेच बाळापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते रविवारी येथे बोलत होते. आरक्षणासाठी लाखाे मराठा समाज बांधवांचा समावेश असलेले राज्यात मोर्चे निघाले परंतु तेव्हा शांतता होती. आता अशांतता कशी असा प्रश्नही उपस्थित करित मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काही पक्षांना एक टक्यापेक्षा जास्त मते मिळाली नाहीत़ अॅड प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला उत्तम मते मिळाली असे असताना त्यांना बैठकीचे आमंत्रण दिले नाही.यातूनच काॅंग्रेस आणि शरद पवार यांचा आंबेडकरांप्रति असलेला द्वेष दिसून येत असल्याचा आराेप आ. बावनकुळे यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करायचे आहे. यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
२८ लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही संवाद यात्रा फिरत असून, हा तेरावा मतदारसंघ आहे. आगामी लाेकसभा निवडणुकीत भाजपाचीच सत्ता आणण्यासाठी संकल्प घ्या, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.आता ही पदयात्रा रद्द झाली असली तरी नोव्हेंबर मध्ये यात्रा काढण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती ,यात्रा संयोजक बाळ भेगडे, जयंत डेहनकर, किशोर मांगटे पाटील, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, प्रदेश प्रवक्ता मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर,बळीराम सिरस्कार, वसंतराव खोटरे, डाॅ. रणजीत पाटील कृष्णा शर्मा, शाम बढे, माधव मानकर, संजय गोडा, संजय जीरापूरे, रमण जैन, अमोल साबळे, रमेश लोहकपुरे, संतोष पांडे ,अमोल गोगे, निलेश निनोरे, राजेश नागमते विराजमान होते. बैठकीला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती हाेती.