भाजप, काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:23 AM2021-07-07T04:23:27+5:302021-07-07T04:23:27+5:30
अकोला: जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची यादी सोमवार, ५ ...
अकोला: जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची यादी सोमवार, ५ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या वतीने जिल्हा परिषदेच्या १२ जागांसह पंचायत समित्यांच्या २७ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले असून, काॅंग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेच्या १२ जागांसह पंचायत समित्यांच्या २३ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
भाजपचे जि.प.गटनिहाय असे आहेत उमेदवार!
भाजपच्या वतीने जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये घुसर : जगदीश घोडे, कुरणखेड : कमलाकर गावंडे, कानशिवणी: जयश्री राऊत, शिर्ला : अनंत बगाडे, अंदुरा : मंगला तायडे, देगाव: विष्णू जढाळ, दानापूर : गणेश ढाकरे, अडगाव: सुष्मा मानकर, तळेगाव: नयना मनतकार, अकोलखेड : पीयूष बिजने, कुटासा : कोमल पेटे, बपोरी : माया कावरे, लाखपुरी : धनंजय ढोक व दगडपारवा जि.प.गटातून डाॅ.प्रिया महल्ले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यासोबतच पंचायत समित्यांच्या २८ गणांपैकी २७ गणांतील उमेदवारांची यादी भाजपच्यावतीने जाहीर करण्यात आली.
काँग्रेसचे जि.प.गटनिहाय असे आहेत उमेदवार!
जिल्हा परिषदेच्या १२ गटांसाठी काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दानापूर : गजानन काकड, अडगाव बु. : खालेदाबी डाॅ.गुलाम नबी, तळेगाव बु. : अंजूम फिरदोस अफरोज खाॅ, अकोलखेड : मुकुंदराव निचळ, कुटासा : अर्चना जगताप, घुसर : मीरा पंजाबराव गोपनारायण, कुरणखेड : लिला टोबरे, कानशिवणी : शैला इंगळे, अंदुरा : अर्चना तायडे, देगाव : प्रशांत मानकर, दगडपारवा : रेखा राठोड व शिर्ला जि.प. गटातून शरद अमानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच पंचायत समित्यांच्या २३ गणांसाठी काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.