भाजप नगरसेवकांनी केली जल शुद्धीकरण केंद्रांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:17 AM2021-02-08T04:17:02+5:302021-02-08T04:17:02+5:30
तेल्हारा नगरपालिकेचे भाजपा नगरसेवकांनी जल शुद्धीकरण केंद्र हिवरखेड येथे आकस्मिक भेट देऊन जलशुद्धीकरणाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना आढळलेल्या जलशुद्धीकरण ...
तेल्हारा नगरपालिकेचे भाजपा नगरसेवकांनी जल शुद्धीकरण केंद्र हिवरखेड येथे आकस्मिक भेट देऊन जलशुद्धीकरणाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना आढळलेल्या जलशुद्धीकरण बाबाच्या त्रुटी समस्या जाणून घेत त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून मार्ग काढण्यास सांगितले. वान धरणाचे पाणी हे जलशुद्धीकरण केंद्रावर येऊन त्यानंतर संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक अनुप पाटील मार्के यांना जलशुद्धीकरणाची संपूर्ण प्रक्रिया माजी पाणीपुरवठा सभापती सुनील राठोड यांनी समजावून सांगितली. जलशुद्धीकरणाच्या दोन युनिटपैकी एका युनिटची शुद्धिकरण सामुग्री बदलण्याचे काम चालू असून सदर वापरण्यात येणाऱ्या सामग्रीची पाहणी केली. यावेळी नगर परिषदेचे भाजप नगरसेवक नरेश आप्पा गंभीरे, नगरसेवक सुनील राठोड, अनुप पाटील मार्के, मंगेश सोळुंके, भाजपा शहर सरचिटणीस गजानन गायकवाड, पाणीपुरवठा अधिकारी बनकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.