चान्नी ग्रामपंचायतीमधील अनियमिततेची चौकशी करण्याची भाजपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:32 AM2021-02-06T04:32:31+5:302021-02-06T04:32:31+5:30
दिलेल्या तक्रारीत ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी, डिजिटल शाळा, वित्त आयोग निधी, सार्वजनिक रस्ते, शौचालय, मुख्यमंत्री पेयजल योजना, आरओ मशीन यामध्ये अनेक ...
दिलेल्या तक्रारीत ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी, डिजिटल शाळा, वित्त आयोग निधी, सार्वजनिक रस्ते, शौचालय, मुख्यमंत्री पेयजल योजना, आरओ मशीन यामध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. अनेकदा तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांना दिला आहे. तसेच अपंग बांधवांकरिता येणाऱ्या तीन व पाच टक्के निधीपासून अपंग बांधव वंचित आहेत. निधी का थांबविण्यात आला, असा प्रश्नही निवेदनात करण्यात आला. निवेदन देणाऱ्यांमध्ये भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विठ्ठल ताले, अपंग संघटनेचे रामदास काकड, माजी सरपंच प्रेमचंद शर्मा, महादेव जानकर, अजय जैन, दिनकर इंगळे, अजय चाले, गजानन ताले, शंकर इंगळे, अक्षय बर्डे, प्रफुल्ल सरदार, नारायण इंगळे, रामदास काकड, मंगेश सोनवणे, नागेश सोनवणे, भीमराव सरदार, आकाश गिरे, कुणाल सोनवणे, वसंत येनकर यांचा समावेश होता.