भाजपतर्फे गरजूंना ब्लँकेट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:19 AM2021-01-03T04:19:59+5:302021-01-03T04:19:59+5:30

रेल्वे स्टेशन चाैकात व्हाॅल्व्ह नादुरुस्त अकाेला : रेल्वे स्टेशन परिसरातील मनपाच्या हिंदी शाळेच्या आवारात जुन्या जलकुंभाचा ६०० मिमी व्यासाचा ...

BJP distributes blankets to the needy | भाजपतर्फे गरजूंना ब्लँकेट वाटप

भाजपतर्फे गरजूंना ब्लँकेट वाटप

Next

रेल्वे स्टेशन चाैकात व्हाॅल्व्ह नादुरुस्त

अकाेला : रेल्वे स्टेशन परिसरातील मनपाच्या हिंदी शाळेच्या आवारात जुन्या जलकुंभाचा ६०० मिमी व्यासाचा ‘आऊटलेट व्‍हॉल्‍व्ह’ नादुरुस्त झाला आहे. जलप्रदाय विभागाने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असून, तूर्तास अकोट फैल परिसर, नायगाव, रामदास पेठ, न्यू तापडिया नगर आदी भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

जलवाहिनीची धिम्या गतीने दुरुस्ती

अकाेला : डाबकी राेडवरील प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत येणाऱ्या गणेशनगर चाैक ते भिकमचंद खंडेलवाल महाविद्यालयाच्या मार्गावर रस्त्याच्या दाेन्ही बाजूंनी जलवाहिनीला गळती लागली. मागील चार दिवसांपासून कंत्राटदाराकडून जलवाहिनीची दुरुस्ती केली जात आहे. सदर काम अतिशय संथगतीने हाेत असून, रस्त्याच्या दाेन्ही बाजूला माेठा खड्डा खाेदण्यात आल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता आहे.

कचराकुंडीतील कचऱ्याला आग

अकाेला : खाेलेश्वर मार्गावरील महापालिकेच्या अतिक्रमण विभागासमाेर लाेखंडी कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. घंटागाड्यांची व्यवस्था असल्यामुळे याठिकाणी कचराकुंडी ठेवणे अपेक्षित नाही. या कचराकुंडीतील कचऱ्याला आग लागल्याचे चित्र शनिवारी पहावयास मिळाले. आगीमुळे धूर निघत असल्याने स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागला.

मनपाच्या आवारभिंतीलगत अतिक्रमण

अकाेला : महापालिकेच्या आवारभिंतीलगत दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या जागेवर लघु व्यावसायिक, रेडिमेड कापड व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याचे समाेर आले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत आहे. हे अतिक्रमण मनपा हटवणार का, असा सवाल उपस्थित हाेत आहे.

घंटागाड्यांवर ‘जीपीएस’नाही!

अकाेला : शहरात दैनंदिन कचरा जमा करणारे घंटागाडी चालक खुले भूखंड, सार्वजनिक जागेवर कचरा टाकून पसार हाेत असल्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मनपाने वाहनांवर ‘जीपीएस’ यंत्रणा कार्यान्वित करणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्याचे समाेर आले आहे.

सर्व्हिस राेडच्या दुरुस्तीकडे पाठ!

अकाेला : शहरात निमवाडी ते खदान पाेलीस ठाण्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. यादरम्यान, या मार्गावर उड्डाण पुलाचेही काम सुरू असून, त्याच्या दाेन्ही बाजूंनी असलेल्या सर्व्हिस राेडची अतिशय दुरवस्था झाली आहे. याच्या दुरुस्तीकडे कंत्राटदाराने पाठ फिरवल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

‘अमृत’च्या पाइपची पळवापळवी

अकाेला : ‘अमृत’ याेजनेंतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे बदलण्याचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने रस्त्यालगत उघड्यावर पाइप टाकले आहेत. यामधील सहा, आठ ते दहा इंच व्यासाच्या पाइपची नागरिकांनी पळवापळवी सुुरू केल्याची माहिती आहे. यामुळे जलवाहिनीचे जाळे टाकताना कंत्राटदाराला अडचणीचा सामना करावा लागत आहे.

डाॅ. आंबेडकर मैदानावर अतिक्रमण

अकाेला : जुने शहरातील डाबकी राेडवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या जागेवर अतिक्रमकांनी झाेपड्या उभारल्याचे समाेर आले आहे. मैदानालगत नागरिकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शाैचालय असून, त्या ठिकाणीसुद्धा लाकूड व्यावसायिकांनी अतिक्रमण थाटले आहे.

Web Title: BJP distributes blankets to the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.