सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन - मदन भरगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 05:57 PM2019-06-19T17:57:58+5:302019-06-19T18:18:11+5:30
सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन येत्या पंधरा दिवसात सुरू करणार आहे, असे मिशन अकोला विकास चळवळीचे प्रणेते माजी महापौर मदन भरगड यांनी सांगितले.
अकोला: देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. अकोल्याला देखील केंद्रीय मंत्री पद मिळाले आहे. म्हणूनच आता अकोलेकरांच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी भाजपाला मिळाली आहे. अकोल्यात आतापर्यंत भाजपाच सत्तेत होती. मात्र, कोणतेही विकासात्मक कार्य त्यांनी केले नाही. अकोलेकारांच्या उपकाराची त्यांना कदाचित आठवण नसेल, पण त्यांना आठवण करू न देण्याचे कार्य मिशन अकोला विकास करणार आहे. सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यासाठी ध्यानाकर्षण आंदोलन येत्या पंधरा दिवसात सुरू करणार आहे, असे मिशन अकोला विकास चळवळीचे प्रणेते माजी महापौर मदन भरगड यांनी सांगितले.
शहरातील महत्वपुर्ण विषयावर वार्तालाप करण्यासाठी भरगड यांनी बुधवारी पत्रकार परिषद आमंत्रित केली होती. यावेळी त्यांनी शहरातील विविध विषयावर पत्रकारांसोबत चर्चा केली. शहरात बेरोजगारीची समस्या वाढलेली आहे. सुशिक्षित युवक मोठया शहरांकडे धाव घेत आहेत.एमआयडीसीतील उद्योगधंदे डबघाईस आले आहेत. येथील कामगार इतर शहरात रोजगारासाठी स्थलांतर करीत आहेत. येथील बेरोजगारांना आपल्याच शहरात रोजगार मिळावा, यासाठी सावतराम मिल पुन्हा सुरू करण्यात यावी. सावतराम मिलचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी मदन भरगड ध्यानकर्षण आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहेत.
शहरातील महिला बचत गटांना देखील आपल्या दर्जेदार उत्पादित वस्तुच्या विक्रीची समस्या भेडसावते. या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. यासाठी महानगरपालिकेच्या अखत्यारितील भाटे ग्राउंड किंवा राजपुतपुरा येथील मनपाची बंद असलेल्या शाळा क्रमांक २ ची जागा उपलब्ध करू न देण्यात यावी, असे देखील भरगड म्हणाले. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत महापालिेकत आतापर्यंत ६५ हजार अर्ज घरकुलासाठी आले आहेत. परंतू तीन वर्षा त केवळ १५० च्या आसपास घरकुल झाले आहेत. पावसाळा सुरू झाला तरी देखील हजारो नागरिकांच्या डोक्यावर छत नाही. यासाठी घरकुलांची निर्मिती तीव्रगतीने करावी. शहरातील १ लाख पाच हजार मालमत्ता धारंकाना महापालिकेने अवास्तव कर आकारणी केली आहे. महानगरपालिकेने आकारणी केलेला लुटमार टॅक्स रद््द करण्यात यावा, शासकीय जमिनीवर राहणाºया लाखो नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क दयावा, गुंठेवारी जमिनीचा ले-आउट नियमित करावा, बी-टेन्युअर जमिनीचा ए-टेन्युअर मध्ये बदल करावा, आदी मागण्यासाठी भरगड आंदोलन करू न सरकारचे लक्ष अकोला शहरासह जिल्हयाचा विकास व्हावा,यासाठी लक्ष वेधणार आहेत. यासर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन विविध माध्यमातुन सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही भरगड म्हणाले.