अकोल्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस मारले जोडे

By आशीष गावंडे | Published: July 18, 2023 05:43 PM2023-07-18T17:43:12+5:302023-07-18T17:43:36+5:30

भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोमवारी रात्री सर्वत्र प्रसारित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

BJP leader Kirit Somaiya's effigy beaten up in Akola | अकोल्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस मारले जोडे

अकोल्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस मारले जोडे

googlenewsNext

अकोला: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे देशभरात महाराष्ट्राची बदनामी झाल्याचा आरोप करीत ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांनी मंगळवारी संत तुकाराम चौकात सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी महिला शिवसैनिकांनी केली.

भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोमवारी रात्री सर्वत्र प्रसारित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनमानसाची मान शरमेने खाली गेल्यामुळे सोमय्या यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करित उद्धव ठाकरे गटातील महिला शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून संताप व्यक्त केला. आंदोलनात महिला जिल्हासंघटीका देवश्री ठाकरे, उपजिल्हा संघटक रेखा राऊत, उपजिल्हाप्रमुख मंगेश काळे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनिकर, माजी नगरसेविका मंजुषा शेळके यासह असंख्य महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.

Web Title: BJP leader Kirit Somaiya's effigy beaten up in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.