शेतकऱ्यांसाठी आंदोलन: भाजपा नेते यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक
By atul.jaiswal | Published: December 4, 2017 05:43 PM2017-12-04T17:43:52+5:302017-12-04T22:15:43+5:30
अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली.
अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली.
शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकºयांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी शेतकरी जागर मंचाने सरकारविरुद्ध एल्गार पुकारला असून, या आंदोलनाअंतर्गत जिल्हाभरातील शेतकºयांनी सोमवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. प्रशासनाने आमच्यापर्यंत येऊन आमचे म्हणने ऐकून घ्यावे, अशी भूमिका आंदोलक शेतकºयांनी घेतल्या नंतर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आंदोलकांना भेट देऊन त्यांचे म्हणने ऐकुन घेतले. या बोलणीदरम्यान आंदोलकांचे समाधान झाले नाही. पुढील एक तासात प्रशासनाने शेतकºयांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढला नाही, तर शेतकरी काहीही करण्यास मोकळे आहेत, असा ‘अल्टिमेटम’ यशवंत सिन्हा यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना दिला होता. तासाभरात प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आंदोलकांनी पुन्हा जिल्हाधिकाºयांना भेटण्याची गळ घातली; परंतु जिल्हाधिकाºयांनी भेटण्यास मनाई केली. त्यानंतर पोलिसांनी यशवंत सिन्हा, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार , शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे, तात्या कृपाळ, सुरेश रामगुंडे, गजानन अमदाबादकर, प्रशांत गावंडे यांच्यासह आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांना अकोला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.
नाफेडचे उडीद, मूग, सोयाबीन व तूर विक्रीसाठी असलेले क्लिष्ट नियम बदलून, शेतकºयांचा शेतमाल हमीभावाने विकत घ्यावा, आर्थिक अडचणीतून शेतकºयाला बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्व शेतमालासाठी भावांतराची योजना लागू करावी. कपाशीवरील बोंडअळीचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी ५0 हजार नुकसान भरपाई द्यावी, शेतकºयांना व्याज व दंडासह आकारलेल्या अवाजवी वीज देयक पाठविले आणि वीज तोडणी सुरू केली. हे थांबवून शेतकºयांना दिलासा द्यावा, पीक विमा तातडीने देण्यात यावा आणि त्यावर तोडगा काढावा, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून, दुष्काळी अनुदान द्यावे, सोनेतारण कर्जमाफीपासून वंचित ३५ हजार शेतकºयांना न्याय द्यावा, कर्जमाफी फसवी असल्यामुळे या योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलावे आणि शेतकºयांच्या मुलांची तीन वर्षांपासून थकीत शिष्यवृत्ती द्यावी या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाने आंदोलन छेडले आहे.