गुजरात, हिमाचलमध्ये भाजपला बहुमत : अकोल्यातील भाजपने केला विजयाचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 02:16 PM2017-12-18T14:16:27+5:302017-12-18T14:19:38+5:30
अकोला : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केल्याबद्दल अकोल्यातील भाजप ने शहरात ठीक ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
अकोला : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केल्याबद्दल अकोल्यातील भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जल्लोष केला. खा संजय धोत्रे , आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, डा.ॅ रामदास आंबटकार, डॉ. उपेंद्र कोठीकर यांच्या मार्गदर्शनात महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यालय, जय प्रकाश नारायण चौक, गीता नगर व शहरात ठीक ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे व लाडू वाढले तसेच आतिषबाजी केली. ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्य केले, तर महिला पदाधिकाºयांनी फुगडीचा फेर धरला.
हिमाचल प्रदेश मधील व गुजरात मधील विजय हा कार्यकर्ता व विकासावर शिक्का मोर्त असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचावर जनतेचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया खा. धोत्रे यांनी दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, गिरीश जोशी,अजय शर्मा, डॉ. विनोद बोर्डे, धनंजय गिरीधर, राजेंद्र गिरी, उखंदराव सोनोने, सुमनताई गावंडे, वैशाली शेळके, गीतांजली शिगोकार,निलेश निनोरे, प्रा. अनुप शर्मा,बबलू सावंत ,मनीष बाछुका, गणेश कंडारकर, रमेश कोठारी, माधव मानकर, अॅड. सुभाष सिंग ठाकूर, विनोद सिंग ठाकूर ,चंदा शर्मा,चंदा ठाकूर,सोनल ठक्कर, पुष्पा वानखडे, रेखा नालट , सुनंदा चांदूरकर ,रंजना विंचनकार , साधना ठाकरे ,निशा कळी , मंगला सोनोने ,मंगला म्हैसने ,सुनीता अग्रवाल ,साधना येवले , शारदा ढोरे , आम्रपाली उपर्वत ,अनुप गोसावी बाळ टाळे , अक्षय गंगा खेडकर ,हरीश आलिंचंदाणी,हिरा कृपलानी ,दीप मानवांनी ,विजय इंगळे, अमोल इंगळे ,हरीश आमनकर ,बबलू पालसपगार ,अभिजित बांगर ,अभिषेक भगत ,अमित बांगर ,अभिषेक काटे ,आकाश ताळे , व्यंकट ढोरे , धनंजय धाबले ,सिद्धार्थ उपर्वत ,सुजित ठाकूर ,पवन पाडिया ,हरिभाऊ काळे ,रमेश करिया ,विजय दुबे ,डॉ युवराज देशमुख , सुरेश जाधव ,कमलेश पटेल ,अमर सूर्यवंशी ,डॉ रामकृष्ण डोगरे ,झाकीर हुसेन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.