गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:42+5:302021-03-22T04:16:42+5:30
अकोला : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी खंडणी वसुलीची जबाबदारी पाेलिसांना देऊन पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचे महापाप ...
अकोला : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी खंडणी वसुलीची जबाबदारी पाेलिसांना देऊन पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचे महापाप केले आहे. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सी व किंवा न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत गृहमंत्र्यांना खंडणीवीर असे संबाेधत त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी भाजपाने केली.
भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्याच्या वतीने स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह जयप्रकाश नारायण चौक येथे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात निदर्शने करून आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुखांचे कृत्य महाराष्ट्राच्या इतिहासात काळिमा फासणारे कृत्य असून त्यांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महापौर अर्चना मसने, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, डॉक्टर किशोर मालोकार, राहुल देशमुख, डॉक्टर विनोद बोर्डे, अक्षय गंगाखेडकर, जयंत मसने, व्यंकट ढोरे, गिरीश जोशी, संजय बडोणे, राजेंद्र गिरी, संतोष पांडे, विकी ठाकूर, ॲड. देवाशिष काकड, नीलेश निनोरे, उमेश गुजर, अंबादास उमाळे, जस्मीत सिंह ऑब्राय, ॲड. नितीन गवळी, धनंजय धबाले, अश्विनीताई हातवळणे, चंदाताई शर्मा, अभिमन्यू नळकांडे, महादेव मानकरी, अतुल अग्रवाल, मंगेश चिखले, सागर बोर्डे, संजय गोडफोडे...... अजय शर्मा, विजय इंगळे, तुषार भिरड, महेंद्रसिंग राजपूत, रणजित खेडकर, अतुल अग्रवाल, अक्षय जोशी आदी सहभागी झाले हाेते.