लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजप-सेनेचा सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 03:43 PM2019-01-14T15:43:53+5:302019-01-14T15:44:17+5:30
अकोला: आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत जिल्हावासीयांचा कौल तपासण्यासाठी स्थानिक भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेच्यावतीने हैदराबाद व औरंगाबाद येथील खासगी एजन्सीकडून सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे.
अकोला: आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत जिल्हावासीयांचा कौल तपासण्यासाठी स्थानिक भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेच्यावतीने हैदराबाद व औरंगाबाद येथील खासगी एजन्सीकडून सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघ वगळल्यास भाजपाला विधानसभेच्या दोन मतदारसंघांत डच्चू मिळणार असून, त्या ठिकाणी शिवसेनेचे पारडे जड राहणार असल्याचे संकेत आहेत. या सर्व्हेमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे.
कर्जमाफी असो वा शेतमालाला हमीभाव देण्याच्या मुद्यावरून राज्य सरकारचे कुचकामी धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. सत्तेत येण्यापूर्वी कापूस, सोयाबीन, तूर-हरभरा आदींसह इतर पिकांना हमीभाव देण्याच्या वल्गनेचा भाजप-शिवसेनेला विसर पडल्याचा आरोप शेतकºयांकडून केला जात आहे. शेतमालाची आॅनलाइन नोंदणी केल्यानंतर खरेदीसाठी तब्बल वीस-वीस दिवस झुलवत ठेवण्याच्या युती सरकारच्या कारभारावर शेतकºयांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आहे. यात भरीस भर म्हणून केंद्र शासनाने नोटाबंदी, जीएसटीचा निर्णय घेतल्याने लहान उद्योजक, व्यावसायिकांचे कंबरडे मोडल्याचे बोलल्या जाते. एकूणच, केंद्र व राज्यातील युती सरकारच्या कारभारासंदर्भात निर्माण झालेल्या जनमतामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाºया उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एप्रिल २०१४ मध्ये लोकसभा व त्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली होती. या दोन्ही निवडणुकांचा कालावधी लक्षात घेता स्थानिक भाजप व शिवसेनेच्यावतीने जिल्हावासीयांचा कौल घेण्यासाठी सर्व्हे करण्यात आला. भाजपकडून हैदराबाद व सेनेकडून औरंगाबाद येथील खासगी एजन्सीकडून जिल्ह्यात सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे.
उमेदवारांची ‘मातोश्री’वरून चाचपणी
अकोला लोकसभा मतदारसंघ व जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची थेट ‘मातोश्री’वरून चाचपणी करण्यात आल्याची माहिती आहे. औरंगाबाद येथील एजन्सीच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी अनुकूल मानल्या जात आहेत.
...दोन मतदारसंघ अडचणीत
भाजपसाठी हैदराबाद येथील एजन्सीमार्फत सर्व्हे करण्यात आल्याची माहिती आहे. अक ोला लोकसभा मतदारसंघाबाबत सर्व्हेमध्ये अनुकूल मत नोंदविण्यात आले असले तरी जिल्ह्यातील पाचपैकी दोन विधानसभा मतदारसंघ अडचणीत असल्याचे बोलल्या जाते. पक्षांतर्गत वादापायी विधानसभेचा एक मतदारसंघ भाजपच्या हातून निसटण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याची माहिती आहे.