शहरात भाजप राबविणार सेवासप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:15 AM2021-06-01T04:15:04+5:302021-06-01T04:15:04+5:30
देशात काेराेना आजाराने थैमान घातले असून, या कालावधीत भाजपच्या वतीने सर्वसामान्यांसाठी विविध सेवा देण्यात आल्या असून, अद्यापही मदत कार्य ...
देशात काेराेना आजाराने थैमान घातले असून, या कालावधीत भाजपच्या वतीने सर्वसामान्यांसाठी विविध सेवा देण्यात आल्या असून, अद्यापही मदत कार्य सुरूच आहे. कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी शहरातही कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. नागरिकांना सोईचे व्हावे, यासाठी पक्षाकडून हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना काेविड केअर सेंटरमधील बेड उपलब्धतेबाबत माहिती देणे, लॉकडाऊनमध्ये शहरात अडकलेल्या मजुरांना तसेच शहरातील गरजूंना भोजन पुरविणे इत्यादी कामे केली जात आहेत. केंद्रातील भाजप सरकारला सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहरात सेवासप्ताह राबविला जाणार असल्याची माहिती महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली. यामध्ये शहरातील सर्व आशा सेविका यांना साडी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाईल. तसेच शहरातील १२ हजार नागरिकांचा प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत १२ रुपयांचा विमा काढण्यात येईल. रक्तदान आणि लसीकरणासंदर्भात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे एक हजार कार्यकर्ते सेवासप्ताहात सहभागी होतील.