तिरंगी लढतीचा भाजपला फायदा

By admin | Published: May 18, 2014 12:22 AM2014-05-18T00:22:36+5:302014-05-18T00:23:39+5:30

अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या २0 वर्षांत काँग्रेसने कधीच विजय पाहिलेला नाही. आघाडीच्या राजकारणात काँग्रेसने पाठिंबा दिलेला उमेदवार दोन वेळा विजयी झाला होता.

BJP's advantage in tri-series | तिरंगी लढतीचा भाजपला फायदा

तिरंगी लढतीचा भाजपला फायदा

Next

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या २0 वर्षांत काँग्रेसने कधीच विजय पाहिलेला नाही. आघाडीच्या राजकारणात काँग्रेसने पाठिंबा दिलेला उमेदवार दोन वेळा विजयी झाला होता. मात्र, २00४ पासून पुन्हा भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले आहे. २00९ मध्ये भाजपने हा गड राखल्यानंतर २0१४ मध्ये पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. तिरंगी लढतीत नेहमीच भाजपाला धार्मिक समीकरणाचा फायदा होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे यांनी मिळविलेला विजय मोदी लाटेचा परिणाम असला तरी धार्मिक समीकरणामुळे भाजपविरोधकांच्या मतांमध्ये झालेले विभाजनही धोत्रे यांच्या विजयाचे प्रमुख कारण ठरले. 

सत्ता आणि खासदाराचे गणित अखेर जुळले!

अकोला लोकसभा मतदारसंघात निवडून आलेला खासदार आणि केंद्रातील सत्ता हे गणित १९८९ नंतर प्रथमच जुळले आहे. यापूर्वी भाऊसाहेब फुंडकर दोन वेळा निवडून आले, त्यावेळी केंद्रात भाजपविरोधी सरकार आले होते. १९९६ मध्ये पुंडकर विजयी झाले. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी सरकार १३ दिवसांमध्ये कोसळले होते. पुढे १९९८ आणि १९९९ मध्ये अँड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळविला, तेव्हा काँग्रेसविरोधी पक्षाची सत्ता आली. त्यानंतर २00४ आणि २00९ मध्ये संजय धोत्रे यांनी विजय मिळविला. त्यावेळीसुद्धा केंद्रात भाजपविरोधी पक्षाची सत्ता आली. यावेळी प्रथमच अकोला लोकसभा मतदारसंघात निवडून आलेल्या खासदारांच्या पक्षाची दिल्लीत सत्ता आली आहे. मिळविला होता. त्यानंतर काँग्रेस आणि अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघामध्ये आघाडी झाल्यानंतर दोन वेळा भाजपला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. काँग्रेस आणि भारिप यांना एकमेकांशिवाय पर्याय नाही, हे २00४ आणि २00९ च्या निवडणुकीत सिद्ध झाले होते. असे असतानाही भारिप आणि काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला त्यादिवशीच भाजपचा विजय निश्‍चित झाला होता. त्यातही काँग्रेसने अल्पसंख्याक समाजातील हिदायत पटेल यांना उमेदवारी दिल्याने आंबेडकर यांच्या मार्गात आणखी एका अडथळ्य़ाची भर पडली. सहकारक्षेत्राबाहेर कोणतीही वेगळी ओळख नसलेल्या हिदायत पटेल यांच्या पाठीशी अल्पसंख्याक समाज ताकदीने उभा राहिला तर आंबेडकर यांना दलितेतर मतांची मोट बांधण्यात अपयश आले. त्यामुळे काँग्रेस आणि भारिप यांच्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन धोत्रे यांना फायदा होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यातच पावणे दोन लाख नवीन मतदार नव्याने जुळले होते. या मतदारांना काँग्रेसच्या परंपरेचे काही घेणे-देणे नसल्याने हा गट मोदी लाटेच्या प्रभावात आला. त्याचा फायदा धोत्रे यांना मिळाल्याने त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झाली. पक्षांतर्गत असंतोष, जनसामान्यांमध्ये न मिसळणारा खासदार आणि अकार्यक्षम असलेले लोकप्रतिनिधी, अशी सर्वसामान्यांमध्ये झालेली भावना, अशा प्रतिकूल परिस्थितीतही धोत्रे यांना मोठय़ा फरकाने मिळालेला विजय हा केवळ मोदी लाट आणि धार्मिक समीकरणं जुळून आल्यामुळेच शक्य झाला.

 

Web Title: BJP's advantage in tri-series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.