वैद्यकीय उपचारासाठी भाजपाचा मदतीचा हात; रुग्णाला एक लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:42 PM2018-05-11T13:42:37+5:302018-05-11T13:42:37+5:30
शैलेश मधुकर वाघमारे यांच्या हिप रेप्लेसमेंटकरिता आ. शर्मा यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत मिळवली.
अकोला : कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यास किंवा आजाराने ग्रासल्यास त्या कुटुंबाला धीर देण्याची नितांत आवश्यकता असते. आमदार गोवर्धन शर्मा मागील अनेक वर्षांपासून सामाजिक जाणिवेचे भान जोपासत अशा कुटुंबीयांसाठी मदतीचा हात समोर करतात. शैलेश मधुकर वाघमारे यांच्या हिप रेप्लेसमेंटकरिता आ. शर्मा यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत मिळवली. गुरुवारी शैलेश वाघमारे यांच्या आईकडे ५० हजारांचा धनादेश सोपविण्यात आला.
अकोला जिल्ह्यातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरदेखील श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला जातो. शोभायात्रा समितीसह मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीसाठी आ. गोवर्धन शर्मा सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. शैलेश वाघमारे यांच्या हिप रेप्लेसमेंट आजारासंदर्भात सर्व माहिती घेतल्यानंतर आ. गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वाघमारे कुटुंबीयांसाठी एक लाख रुपयांची मदत मिळवली. आ. शर्मा यांच्या निवासस्थानी शैलेश वाघमारे यांच्या आईकडे उर्वरित ५० हजारांचा धनादेश सोपविण्यात आला. यावेळी रमन पाटील, नगरसेवक अमोल गोगे, नगरसेविका जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे, दिलीप मिश्रा, अमोल गीते, हेमंत शर्मा आदी उपस्थित होते.