भाजपचे स्वबळ!

By admin | Published: February 24, 2017 02:52 AM2017-02-24T02:52:27+5:302017-02-24T02:52:27+5:30

अकोल्यात भारतीय जनता पक्षाचा झंझावात कायम असून, महापालिका निवडणुकीत भाजपाने यावेळी एकतर्फी विजय प्राप्त केला आहे.

BJP's self! | भाजपचे स्वबळ!

भाजपचे स्वबळ!

Next

अकोला, दि. २३- नोटाबंदीनंतर भाजपला अकोल्यातील मतदार नाकारतील, असाच सुरुवातीला सूर होता. प्रतिपक्षांच्या सर्वच नेत्यांनी या विषयावर प्रचारात रानं उठवले. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या अंतिम चरणात घेतलेल्या सभेने शहरातील चित्र पालटले. शहराचा विकासाचे दिलेले त्यांनी आश्‍वासन, स्मार्ट सिटीचे दाखवलेले स्वप्न अकोलेकरांना भावले. त्याचा प्रत्यय ईव्हीएम यंत्रातून आला. ३0 जागांच्या आत भाजपा गुंडाळल्या जाईल, असाच राजकीय विश्लेषकांचा कयास होता. तो खोटा ठरवत अकोलेकरांनी भाजपच्या झोळीत भरभरू न मतदानाचे दानं केलं आहे.
महापालिकेच्या ८0 जागांपैकी ४८ जागांवर कब्जा करीत अकोला महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावेळी महापालिकेत २४ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय कदाचित भाजपाच्या अंगलट येईल, असेही चित्र रंगविण्यात आले होते. २४ गावांत भारिप-बहुजन महासंघ व शिवसेनेचे वर्चस्व होते आणि बहुअंशी ते सत्यही होते. पण, या निवडणुकीने सर्व चित्रावर डस्टर फेरले असून, २४ गावांतील मतदारांनी काही अपवाद वगळता भाजपलाच कौल दिला आहे. विकासापासून कोसो दूर असलेल्या २४ गावांतील मतदार, नागरिकांच्या या निकालानंतर आता अपेक्षा वाढल्या आहेत. विकासाच्या बाबतीत निर्णय घेताना भाजपाला आता कोणतीही अडचण येणार नाही, असे समाधान, नव्याने महापालिकेत जुळलेल्या गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर आहे.
दरम्यान, अकोल्याच्या महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. विकास कामे वेगाने करण्यासाठीची संधी अकोलेकरांनी भाजपाला दिली आहे. इतर पक्षाच्या दिग्गजांना नाकारत त्यांना घरी बसवले आहे. यामध्ये काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड आणि सुरेश पाटील यांच्यासह सलग पाचवेळा निवडणूक जिंकणारे माजी उपमहापौर सुनील मेश्राम यांचाही समावेश आहे.

Web Title: BJP's self!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.