अकोटात भाजपाचे ‘ताळा ठोको, हल्लाबोल’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:33 AM2021-02-06T04:33:29+5:302021-02-06T04:33:29+5:30
कोरोना काळातील वीजमाफीचे आश्वासन देऊन न पाळणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यतील जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करण्यात आला. ...
कोरोना काळातील वीजमाफीचे आश्वासन देऊन न पाळणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यतील जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करण्यात आला. ग्राहकांना वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीस पाठविल्या त्याच्या निषेधार्थ भाजपातर्फे स्थानिक दर्यापूर मार्गावरील महावितरणच्या कार्यालयसमोर ताळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे, अकोला जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रभाकर मानकर, जिल्हा संपर्क प्रमुख राजेश नागमते, शहर भाजपा अध्यक्ष कनक कोटक, तालुका भाजपा अध्यक्ष प्रा.अशोकराव गावंडे, संतोष राठौर, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे,उपाध्यक्ष अबरार खॉ, जि.प.सदस्य प्रकाश आतकड, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा कुसुम भगत, जिल्हा चिटणीस राजेश रावणकर, आरोग्य सभापती गजानन लोणकर, पाणीपुरवठा सभापती मंगेश चिखले, नगरसेवक मंगेश पटके, कल्पना घावट, माया धुळे, जितु कुमार जेसवाणी, बाळासाहेब घावट, चंचल पिंताबरवाले, प्रवीण डिक्कर, अनिरुध्द देशपांडे, प्रा.जयदेवराव साबळे, मधुकर बोडखे, योगेश नाठे, प्रभाकर पांडे, विजय जवंजाळ, गोपाल पेठे, किशोर आसरकर, आदिसह नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाचे संचलन नगरसेवक मंगेश लोणकर यांनी केले. शहरचे पोलीस निरिक्षक संतोष महल्ले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. (फोटो)