शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 11:03 AM2020-11-03T11:03:29+5:302020-11-03T11:03:37+5:30

Akola News भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत उतरण्यासाठी गांभीर्याने चाचपणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

BJP's test for teacher constituency elections | शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपची चाचपणी

Next

- राजेश शेगाेकार

अकोला: विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून, यावेळी भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत उतरण्यासाठी गांभीर्याने चाचपणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या प्रतिनिधीचा सहा वर्षांचा कार्यकाळ १९ जुलै रोजी संपला आहे; मात्र काेराेनाच्या उद्रेकामुळे निवडणूक आयोगामार्फत निवडणुकीची तारीख निश्चित केली जात नव्हती ती आता जाहीर झाली असून, येत्या १ डिसेंबर राेजी निवडणूक हाेत आहे. या निवडणुकीसाठी सर्व शिक्षक संघटनांनी निवडणुकीची तयारी जाेरात केली आहे. अलीकडच्या काळात शिक्षक मतदारसंघाची निवडणूकसुद्धा (सार्वत्रिक) निवडणुकीसारखी हाेत असल्याने राजकीय पक्षांचा थेट सहभाग हाेत आहे. त्यामुळेच यावेळी आता भारतीय जनता पार्टी रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. त्यासाठी तीन उमेदवारांच्या नावाबाबतही विभागातील पाचही जिल्ह्यात गाेपनीय चाचपणी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

शिक्षक मतदारसंघासाठी आतापर्यंत ३१ हजार २०९ शिक्षक मतदारांची नोंदणी झाली आहे. यंदा निवडणुकीत शिक्षक संघटनांच्या उमेदवारांसह अनेक धनाढ्य उमेदवारसुद्धा रिंगणात उतरले असल्याने, निवडणूक चुरशीची होणार आहे. निवडणुकीसाठी राज्य शिक्षक परिषद, शिक्षक आघाडी, शिक्षक महासंघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना, विदर्भ ज्युनिअर टिचर्स असोसिएशन (विजुक्टा), भाजप शिक्षक सेल, विभागीय शिक्षक संघ, शिक्षक सेना, खासगी शिक्षक संघटना आदींनी शिक्षक मतदारांची नोंदणी केली आहे. विद्यामान आमदार श्रीकांत देशपांडे यांचेसह अकोल्याचे प्रा. डॉ. अविनाश बोेरडे, विकास सावरकर, वाशिमचे ॲड. किरण सरनाईक, राजकुमार बोनकिले, अमरावतीचे संगीता शिंदे, शेखर भोयर, प्रकाश काळबांडे, डॉ. नितीन धांडे, यवतमाळचे डॉ. नितीन खर्चे बुलडाण्याचे डाॅ. नीलेश गावंडे आदींनी तयारी सुरू केली आहे. भाजपाने स्वतत्रपणे रिंगणात उडी घेतल्यास साहजिकच मतदारसंघाचे समीकरणही बदलणार आहे.

Web Title: BJP's test for teacher constituency elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.