चून-भाकर खाऊन साजरी केली काळी दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 06:18 PM2020-11-13T18:18:44+5:302020-11-13T18:19:18+5:30

Akola BJP News भारतीय जनता पक्ष व भाजपा किसान सेलच्या वतीने शुक्रवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात चून-भाकर आंदोलन करण्यात आले.

Black Diwali was celebrated by BJP at Akola District Collector Office | चून-भाकर खाऊन साजरी केली काळी दिवाळी

चून-भाकर खाऊन साजरी केली काळी दिवाळी

Next

अकोला: अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यंाना सरकारकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने त्यांची दिवाळी अंधारत जाणार आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्ष व भाजपा किसान सेलच्या वतीने शुक्रवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात चून-भाकर आंदोलन करण्यात आले. यावेळी भापजचे लोक प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहोचली नाही. विदर्भातील व मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा, असे वारंवार म्हटले; परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोडधोड, ना रोषणाई म्हणून भाजपा व भाजपा किसान मोर्चाच्यावतीने चून-भाकर आंदोलन करण्यात आले. आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिर्यांच्या दालनासमोर चून भाकर खाऊन प्रतीकात्मकरित्या काळी दीवाळी साजरी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना निवेदनही देण्यात आले.

Web Title: Black Diwali was celebrated by BJP at Akola District Collector Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.