नोटांचा काळाबाजार; एक रुपयाच्या नोटेची किंमत ३0 रुपये
By Admin | Published: December 29, 2015 02:20 AM2015-12-29T02:20:00+5:302015-12-29T02:20:00+5:30
चिल्लरच्या नावावर ठोक लूट; एक रुपयाची नवी नोट मिळतेय अध्र्या डॉलरला.
राम देशपांडे/प्रवीण खेते / अकोला: शहरातील मध्यवर्ती जुन्या-नव्या नोटांचा व्यवसाय करणार्या व्यावसायिकांनी नोटांचा बाजार मांडला असून, रिझर्व्ह बँकेने मार्च २0१५ मध्ये चलनात आणलेल्या एक रुपयाच्या नव्या नोटा प्रत्येकी ३0 रुपयाला विकण्याचा गोरखधंधाच चालविला आहे. राष्ट्रीय संपत्ती म्हणून गणल्या जाणार्या चलनी नोटा अधिक दराने विकल्या जात असल्याची बाब सोमवारी 'लोकमत' चमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान उघडकीस आली. डॉरलच्या तुलनेत आपल्याच देशात एक रुपयाच्या नोटेसाठी सामान्यांना अर्धा डॉलर किंमत मोजावी लागत असल्याने या ठिकाणी नोटांचा काळाबाजार सुरू असल्याचे स्पष्ट होते.
अकोल्यातील सराफा बाजाराजवळ 'बट्टय़ा'चा व्यवसाय करणार्यांची काही दुकाने आहेत. हे व्यावसायिक आपल्या मूळ व्यवसायाव्यतिरिक्त जुन्या-नव्या नोटा आणि नाणी खरेदी-विक्रीचा व्यवसायदेखील करतात. रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या नव्या नोटा आणि नाणीदेखील या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मार्च २0१५ मध्ये रिर्जव बँकेने नव्याने चलनात आणलेल्या एक रुपयाच्या नोटा या ठिकाणी अधिक दराने विकल्या जात असल्याची माहिती मिळाली. सोमवारी 'लोकमत'चमूने त्याच्या पडताळणीसाठी केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान या व्यावसायिकांनी चक्क नोटांचा बाजारच मांडला असल्याचे स्पष्ट आढळून आले. राष्ट्रीय संपत्ती म्हणून नव्याने चलनात आलेल्या एक रुपयाची नोटा या ठिकाणी चक्क प्रत्येकी ३0 रुपयांना विकल्या जात असल्याचे आढळून आले.
स्टिंग ऑपरेशन करणार्या चमूने अधिक नोटांची मागणी केली असता, एक रुपयाच्या १0 नोटा २५0 रुपयांना देण्याची तयारी व्यावसायिकाने दर्शविली.
ही बाब एवढय़ावरच संपत नाही, तर व्यावसायिकाने नुकतेच चलनात आलेले दीडशे रुपयाचे नाणे पाच हजार रुपयांना देऊ केले. चलनात येणार्या नव्या नोटा आणि नाणी सामान्य नागरिकांपर्यंंंत पोहोचण्यास विलंब लागतो. या काळात नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणार्या हौशी आणि सर्वसामान्य नागरिकांची उत्सुकता ताणलेली असताना, त्याची मागणी करणार्यांची गरज लक्षात घेऊन अधिक दराने नाणे-नोटांची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जात असल्याची खळबळजनक बाब या स्टिंग ऑपरेशनदरम्यान उघडकीस आली. अनेकांनी तर बट्टा बाजारमध्ये आपले बस्तान मांडले आहे आणि नागरिकांनी नाण्यांचे आकर्षक दाखवून हे व्यावसायिक लुबाडत आहेत.
हौसेने वाढविली रुपयाची किंमत
असं म्हणतात, हौसेला किंमत नसते. त्याच हौसेपोटी पैशाला किंमत न देता, काडीमोलाच्या वस्तूसाठीही दुप्पट दाम द्यायला लोक तयार होतात. हाच प्रकार रुपयांच्या बाबतीतदेखील होत असेल, याचा कोणी विचारही केला नसेल; परंतु असा धक्कादायक प्रकार अकोल्यातील 'बट्टा' बाजारात होत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले. आंतरराष्ट्रीय बाजारात एका डॉलरची किंमत ६६.२१ रुपये आहे, पण नाणे संग्राहकांना हौस भागवण्यासाठी एका रुपयाच्या नवीन नोटेसाठी चक्क ३0 रुपये मोजावे लागत आहे.
१५0 रुपयाचं नाणं पाच हजाराला
भारतीय रिझर्व्ह बँकेच्यावतीने काही दिवसांपूर्वी एक रुपयाच्या नोटेसोबतच १५0 रुपयांच्या नाण्याचीदेखील निर्मिती केली आहे. हे नाणं चांदीचं असून, अद्यापही ते बाजारपेठेत चलनात आले नाही; परंतु शहरातील ह्यबट्टाह्ण बाजारात या नाण्याचे बुकिंग सुरू असून, त्यासाठी तब्बल पाच हजार रुपये मोजावे लागत असल्याचे संबंधित व्यापार्याने 'लोकमत' चमूला स्टिंग ऑपरेशनदरम्यान सांगितले.
बँक कर्मचारी म्हणतात..
शहरातील 'बट्टा' बाजारात चालत असलेल्या रुपयांच्या काळाबाजाराचे स्टिंग ऑपरेशन करताना ह्यलोकमतह्ण चमू शहरातील काही बँकांमध्ये पोहोचली. येथे बँक कर्मचार्यांना एक रुपयाच्या नवीन नोटांबद्दल विचारले असता, गत दहा ते पंधरा वर्षांंपासून एक रुपयाची नोट बघितली नसून, नवीन नोटांची आम्हालादेखील प्रतीक्षा आहे, असे उत्तर यावेळी मिळाले.