वस्तुस्थितीची माहिती मागितल्याने खवळले पित्त

By admin | Published: March 16, 2017 02:42 AM2017-03-16T02:42:59+5:302017-03-16T02:42:59+5:30

गोदामातील संपूर्ण तुरीची एफएक्यू तपासणी करण्याची प्रकाश मानकर यांची मागणी.

Bleeding due to the fact information sought | वस्तुस्थितीची माहिती मागितल्याने खवळले पित्त

वस्तुस्थितीची माहिती मागितल्याने खवळले पित्त

Next

अकोला, दि. १५-नाफेडच्या वतीने एजंट म्हणून मार्के टिंग फेडरेशन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तूर खरेदीतील वस्तुस्थितीची माहिती मागितल्याने संबंधितांचे चांगलेच पित्त खवळले आहे. त्यापासून परावृत्त करण्यासाठीच फौजदारी तक्रार दुसर्‍या दिवशी करण्यात आली. या दबावाचा काहीच फरक पडणार नाही. आता शासनाने खरेदी केलेल्या गोदामातील संपूर्ण तुरीची एफएक्यू तपासणी करण्याची मागणी लावून धरू, असे भारत कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर यांनी पत्रकारांना सांगितले.
गेल्या वर्षी बाजारात तुरीला आठ ते दहा हजार रुपये भाव होते. यावर्षी ते ३५00 रुपयांपर्यंंंत खाली आले. शेतकर्‍यांची लूट सुरू असताना शासनाने हमीभावाने तूर खरेदी सुरू केली. त्यातही खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची तूर मागे ठेवत व्यापार्‍यांचीच तूर प्राधान्याने घेण्याचा सपाटा खरेदी केंद्रावर सुरू करण्यात आला. सोबतच शेतकर्‍यांची तूर २0-२0 दिवस केंद्रावर ठेवण्यात आली. त्यातून शेतकर्‍यांना चांगलाच आर्थिक फटका बसत होता. त्यानंतरही तूर गुणवत्तेची नाही, या कारणाने वाहने परत करण्याचा उद्दामपणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रावर सुरू होता. याबाबतची माहिती शेतकर्‍यांनी दिल्यामुळे तूर खरेदी केंद्रावर धाव घेतली, त्यावेळी खरेदी बंद होती. केंद्रावर जाताच जिल्हा मार्के टिंग अधिकारी वाजपेयी यांनी दुपारी १२.३0 वाजतानंतर खरेदी सुरू केली. त्याचवेळी वाजपेयी यांना शेतकर्‍यांना परत का पाठविता, अशी विचारणा केली. त्यांनी गुणवत्तेचा मुद्दा मांडला. त्यावर गोदामात खरेदी केलेली सर्वच तूर एफएक्यू दर्जाची आहे का, याबाबतही गोलमाल उत्तर त्यांनी दिले. त्या दिवशी शेतकर्‍यांना समजावून प्रकरण शांत केले; मात्र दुसर्‍या दिवशी सायंकाळी कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केल्याची तक्रार वाजपेयी यांनी केली. हा प्रकार शेतकर्‍यांची मुस्कटदाबी करण्यासाठी केल्याचेही मानकर म्हणाले.
उशिराने तक्रारीमागे वेगळेच कारण
मार्के टिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांनी एक दिवस उशिराने तक्रार केली. हा प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किती व्यापार्‍यांनी तूर खरेदी केली, त्यांनी कोणत्या भावाने, कोठे विकली, याबाबतची माहिती मागितली. तसेच तूर विक्री करणार्‍या शेतकरी याद्या, त्यांनी विक्री केलेली तूर यासंदर्भातील माहितीही मागितली. त्याचा अर्ज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनाही दिला. त्यानंतर सायंकाळीच गुन्हे दाखल झाल्याने यामागे कुटिल डाव असल्याचा आरोपही मानकर यांनी केला. यावेळी कृषक समाजाचे कार्याध्यक्ष राजकुमार भट्टड, शेषराव पाटील व गोविंद पाटील उपस्थित होते.

Web Title: Bleeding due to the fact information sought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.