आंधळं दळतंय अन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2016 02:03 AM2016-04-29T02:03:54+5:302016-04-29T02:27:16+5:30

अकोला शहरात अस्वच्छता कायम; साफसफाईकरिता २0 लाखांचा चुराडा.

Blind people | आंधळं दळतंय अन..

आंधळं दळतंय अन..

Next

आशीष गावंडे / अकोला
शहरात साफसफाईसाठी महापालिकेच्या २४ ट्रॅक्टर, ८१ अँपे वाहनांद्वारे दररोज कचरा जमा केला जातो. वाहनांसाठी लागणारे इंधन, कर्मचार्‍यांच्या मानधनापोटी अकोलेकरांच्या खिशातून महिन्याकाठी २0 लाखांचा खर्च होतो. शहराच्या कानाकोपर्‍यात घाण व कचरा तुंबल्याचे चित्र असताना मनपा प्रशासनाकडून मात्र कचर्‍याची विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा होत आहे. हा प्रकार म्हणजे ह्यआंधळं दळतंय अन्..ह्ण असा असल्याने आरोग्य, स्वच्छता विभागातील कर्मचार्‍यांचे मूल्यमापन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील साफसफाईच्या मुद्दय़ावर मनपाकडून अनेकदा प्रयोग राबवले जातात. या प्रयोगांपोटी लाखो रुपयांचा चुराडा होत असला तरी समस्या मात्र कायमच राहत असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात घरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी घंटा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
घंटा गाडीद्वारे जमा होणारा कचरा शहराच्या बाहेर घेऊन जाणे अपेक्षित असताना, एकाच प्रभागात दुर्लक्षित ठिकाणी हा कचरा फेकून दिला जात होता. आता शहरात बोटावर मोजता येणार्‍या घंटा गाड्या शिल्लक आहेत. नाल्यांची नियमित साफसफाई न करता, आठवड्यातून एकदा साफसफाई केली जाते. ही घाण ट्रॅक्टरद्वारे जमा होत असली तरी चार-चार दिवस तशीच पडून राहत असल्याने नागरिकांचा जीव मेताकुटीला आला आहे.

Web Title: Blind people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.