मथुरा स्थानकावर ब्लॉक; हमसफरच्या दोन, तर गोंडवाना एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या रद्द
By Atul.jaiswal | Published: January 9, 2024 03:30 PM2024-01-09T15:30:34+5:302024-01-09T15:31:25+5:30
यामध्ये अकोला मार्गे धावणाऱ्या जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस व गोंडवाना एक्स्प्रेस या दोन रेल्वेंचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
अकोला : आग्रा विभागातील मथुरा स्टेशनवर यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरू असून, या कामासाठी पलवल-मथुरा दरम्यान नॉन इंटरलॉकिंग कामासाठी काही मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात येत आहेत. यामध्ये अकोला मार्गे धावणाऱ्या जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस व गोंडवाना एक्स्प्रेस या दोन रेल्वेंचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, १२७५१ नांदेड-जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस २६ जानेवारी व २ फेब्रुवारी रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. १२७५२ जम्मतावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस २८ जानेवारी व ४ फेब्रुवारी रोजी प्रस्थान स्थानकावरूनच रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय १२४०५ भुसावळ-हजरत निझामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस २८ व ३० जानेवारी तसेच ४ व ६ फेब्रुवारी रोजी प्रस्थान स्थानकावरून धावणार नाही. १३४०६ हजरत निझामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस २६ व २८ जानेवारी तसेच २ व ४ फेब्रुवारी रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे.