मुंबई येथे ब्लॉक, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस शुक्रवारी रद्द; शनिवारी परतीची गाडीही रद्द

By Atul.jaiswal | Published: May 25, 2024 06:36 PM2024-05-25T18:36:52+5:302024-05-25T18:37:06+5:30

शनिवारी परतीची गाडीही रद्द : मुंबई येथे दोन दिवस ब्लॉक

Block at Mumbai, Amravati-CSMT Express canceled on Friday Two day block at Mumbai | मुंबई येथे ब्लॉक, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस शुक्रवारी रद्द; शनिवारी परतीची गाडीही रद्द

मुंबई येथे ब्लॉक, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस शुक्रवारी रद्द; शनिवारी परतीची गाडीही रद्द

अकोला: मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे २४ डब्यांच्या गाड्या बसवण्यासाठी प्लॅटफॉर्म १० व ११ च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंगसाठी ३६ तासांचा विशेष ब्लॉक १ जूनच्या मध्यरात्री ते २ जून २०२४ दुपारपर्यंत घेण्यात येणार आहे. परिणामी सीएसएमटी स्थानकावरून परिचालीत होणाऱ्या अनेक गाड्या प्रभावित होणार असून, शुक्रवार, ३१ मे रोजी अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवार, ३१ मे रोजी अमरावती येथून सुटणारी १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस प्रस्थान स्थानकावरच रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी १२२९० नागपुर-सीएसएमटी दुरंतो एक्स्प्रेस व १२२६२ हावड़ा-सीएसएमटी दुरंतो एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. शनिवार, १ जून रोजी १२१११ अमरावती-सीएएमटी एक्स्प्रेस प्रस्थान स्थानकावरूनच रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी १२२८९ सीएसएमटी-नागपुर दुरंतो एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस व ०२१४० नागपुर- सीएसएमटी हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस १ जून रोजी ठाणे स्थानकावर स्थगित करण्यात येतील.

विदर्भ एक्स्प्रेस दोन दिवस दादरपर्यंत
१२१०६ गोंदिया- सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस ३१ मे व १ जून रोजी, १२८१० हावड़ा- सीएसएमटी मेल एक्स्प्रेस ३० व ३१ मे रोजी, १२८६० गीतांजलि एक्सप्रेस व १२८७० हावड़ा- सीएसएमटी एक्सप्रेस ३१ मे रोजी दादर स्थानकापर्यंतच धावणार आहे. या चारही गाड्या परतीचा प्रवास दादर स्थानकावरूनच सुरु करतील.

सेवाग्राम एक्प्रेस दोन दिवस नाशिकपर्यंत
१२१४०नागपुर- सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस ३१ मे आणि १ जून रोजी गाड़ी नासिक स्टेशन येथे शार्ट टर्मिनेशन करण्यात येईल. ही गाड़ी नासिक ते सीएसएमटी दरम्यान रद्द राहील. परतीच्या प्रवासात १२१३९ सीएसएमटी- नागपुर सेवाग्राम एक्स्प्रेस १ व २ जनू रोजी नासिक स्टेशन येथून सुटेल.

Web Title: Block at Mumbai, Amravati-CSMT Express canceled on Friday Two day block at Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.