अखेर‘बीडीओं’नी सादर केले दलित वस्ती कामांचे प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:14 PM2018-09-29T13:14:32+5:302018-09-29T13:14:37+5:30
अकोला : दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत जिल्ह्यातील २४ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव अखेर सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांनी (बीडीओ) शुक्रवारपर्यंत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाºयांकडे सादर केले.
अकोला : दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत जिल्ह्यातील २४ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव अखेर सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांनी (बीडीओ) शुक्रवारपर्यंत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाºयांकडे सादर केले.
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांकडून मागविण्यात आले होते. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांचे प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात गत जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत समाजकल्याण अधिकाºयांमार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांना वारंवार पत्र देण्यात आले; मात्र गटविकास अधिकाºयांकडून दलित वस्ती कामांचे प्रस्ताव प्राप्त झाले नाही. त्यामुळे या मुद्यावर गत १९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानुषंगाने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी १९ सप्टेंबर रोजीच जिल्ह्यातील सातही गटविकास अधिकाºयांना दिला होता. त्यानुषंगाने अखेर २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर व पातूर या सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांकडून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २४ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाºयांकडे सादर करण्यात आले. त्यामुळे प्रस्तावांअभावी रखडलेल्या दलित वस्ती कामांचा मार्ग मोकळा झाला.
प्रस्तावांसाठी २४ वेळा ‘बीडीओं’ना दिले होते पत्र!
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी गत जानेवारी ते १९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाºयांमार्फत २४ वेळा जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांना (बीडीओ) पत्र देण्यात आले; परंतु वारंवार पत्र देऊनही ‘बीडीओं’कडून दलित वस्ती कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले नव्हते.