बोंडअळी जाता जाईना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:07 PM2018-12-08T20:07:57+5:302018-12-08T20:08:06+5:30
- राजरत्न सिरसाट अकोला : कृषी विद्यापीठे, कृषी विभागाने अनेक उपाय योजना करू नही कपाशीवरील गुलाबी बोंडअळी जाता जाईना, ...
- राजरत्न सिरसाट
अकोला: कृषी विद्यापीठे, कृषी विभागाने अनेक उपाय योजना करू नही कपाशीवरील गुलाबी बोंडअळी जाता जाईना, आजही ही अळी कायम आहे. कामगंध सापळे प्रभावी ठरत असल्याचा दावा,तज्ज्ञांनी केला आहे. या तंत्राचा काही प्रमाणात परिणाम दिसून येत असला तरी या अळीचे कायम उच्चाटन झाले नाही. त्यामुळे यावर्षीदेखील डिसेंबर महिन्यातच शेतातील कापूस काढून टाकण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे.
दोन दशकापुर्वी देशात बीटी कपाशीचं वाण आलं, या बीटीमध्ये बोंडअळीला प्रतिबंधात्मक जिन टाकण्यात आल्याने सुरू वातील बोंडअळ््यांवर नियंत्रण मिळविता आले.ज्या विदेशी कंपन्यांनी ही बीटी येथे आणली त्यांनी नंतर हेच वाण नव्याने आणले.पण त्यानंतर त्या वाणाला देशात वापरण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पण सुरू वातीला जे वाण देशात आणले त्यातील बोंडअळी प्रतीरोधक क्षमता संपल्याने कपाशीवर बोंडअळ््याचा प्रादुर्भाव वाढू लागला हा प्रादुर्भाव वेगाने देशातील कापूस क्षेत्रात पोहोचला,महाराष्टÑात येण्याआधी बोंडअळीने गुजरात राज्यात थैमान घातले, त्यानंतर मागीलवर्षी महाराष्टÑातील कापसावर या अळीने आक्रमण केले.जवळपास ५० टक्क्यांच्यावर कापसाचे नुकसान या अळीने केले. गुजरात सरकारने वेगवेगळ््या स्तरावर उपाययोजना करू न या अळीवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले.पण महाराष्टÑात अद्याप पुर्णपणे नियंत्रण मिळविता आले नाही. आजही बोंडअळी कपाशीवर कायम आहे. कृषी विभाग, विद्यापीठांनी शेतकºयांमध्ये जनजागृती मोहीम राबविली. कामगंध सापळे तंत्रज्ञान शेतापर्यंत पोहोचवले परंतु अद्याप बोंडवळीवर नियंत्रण मिळवता आले नाही. अळीच्या प्रकोपाने राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यातील शेतकºयांनी मागीलवर्षी उभ्या पिकांवर नांगर फिरवला होता. यावर्षी सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि, बोंडअळी पूर्णत: नष्ट झाली नसून, प्रादुर्भाव कायम असल्याने शेतकºयांनी फरदडीचा कापूस घेऊ नये, असा सल्ला कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभागाने दिला आहे.
यावर्षी पाऊस कमी झाल्याने कापूस पीक उत्पादनावर परिणाम झाला आहे. सोबतच विविध किडींनीदेखील आक्रमण केले असून, बोंडअळ्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि, या अळीने कपाशीवर बस्तान मांडले आहे. जिनिंगमध्ये येणाºया कापसामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत येत असल्याचे दिसून आले आहे. ही अळी कापसाच्या बोंडातील कोवळा कापूस व बियाणे फस्त करीत असल्यामुळे कापसाची प्रत खराब होेते. ही गुलाबी बोंडअळी कचºयामध्ये पाच ते सहा महिने राहण्याची क्षमता आहे. हीच अळी पुन्हा पुढच्या वर्षीच्या पिकावर हल्ला करते. म्हणूनच या अळीचे नियंत्रण आताच करण्यासाठीची पाऊले उचलण्यात येत आहेत. शेतातून आणलेल्या कापसात ही अळी जिनिंगमध्ये येत असून, तिला पोषक वातावरण मिळताच या अळीचे पतंग बाहेर येतात. फरदडचा कापूस घेतल्यास ही अळी त्यावर पोषण करू शकते. म्हणूनच फरदडचा कापूस घेण्याचे टाळावे, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात येत आहे.म्हणूनच म्हणावे लागत आहे बोंडअळी जाता जाईना.
- हिवाळ्यातच नांगरटी करा!
कपाशी, सोयाबीनचे पीक काढले असेल आणि त्या ठिकाणी काही पेरणी केलेली नसेल तर शेतकºयांनी शेत नांगरू न घ्यावे, कारण पुढच्या वर्षी सोयाबीन या पिकावरदेखील कीड येण्याचा धोका आहे. फरदडचा कापूस फारच तर डिंसेबर महिन्याच्या शेवटापर्यंत काढून टाकवा व शेत नांगरटी करू न घ्यावी, अन्यथा पुढच्या वर्षी पुन्हा अशा शेतातील कापसावर बोंडअळीचा प्रकोप वाढून इतरही शेतावर प्रसार होईल, असा धोका शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. म्हणजे यावर्षी पावसाअभावी उत्पादन घटले आता जो काही फरदडीतून कापूस उत्पादन होईल तेही शेतकºयांना घेता येणार नाही.