पारस येथे २८ जणांनी केेले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:53+5:302021-07-15T04:14:53+5:30
पारस : लोकमत रक्ताचं नातं अभियानांतर्गत लोकमततर्फे रक्तदान महायज्ञ सुरू आहे. त्यानुषंगाने पारस येथे बुधवार, १४ जूलै रोजी ग्रामपंचायत ...
पारस : लोकमत रक्ताचं नातं अभियानांतर्गत लोकमततर्फे रक्तदान महायज्ञ सुरू आहे. त्यानुषंगाने पारस येथे बुधवार, १४ जूलै रोजी ग्रामपंचायत भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात २८ जणांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले.
याप्रसंगी संघर्ष कंत्राटदार समिती औष्णिक वीज निर्मिती केंद्र पारस संघटनेचे अध्यक्ष सतीश तायडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. ऊर्मिला सोनवणे या महिलेनेही रक्तदान महायज्ञात सहभागी होऊन रक्तदान केले. सर्वप्रथम संघर्ष कंत्राटदार कामगार समितीचे अध्यक्ष सतीश तायडे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शिबिराला सुरुवात होऊन २८ जणांनी रक्तदान केले. रक्तसंकलनासाठी अकोला येथील हेगडेवार रक्तपेढीचे डॉ.संदीप मोकाशी, युवराज खोडके, प्रसन्न जोशी, संतोष अंधारे, कविता इंगळे, आशा कडू, नीलिमा पटखेडकर आदींची उपस्थिती होती. रक्तदात्यांना लोकमततर्फे सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू लांडे यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सेवाभावी वृक्षमीत्र सदस्य शिवशंकर कडू, सामाजिक कार्यकर्ते दिनेश डांगे, ग्रामपंचायत पारसचे पदाधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (फोटो)