अकोल्यात महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाला प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 08:13 PM2021-10-03T20:13:54+5:302021-10-03T20:18:21+5:30

Agrsen Jayanti : अग्रसेन भवन येथे रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांसह जयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.

Blood donation camp Maharaj Agrasen Jayanti celebrations starts at Akola | अकोल्यात महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाला प्रारंभ!

अकोल्यात महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाला प्रारंभ!

Next
ठळक मुद्देअस्थिरोग तपासणी शिबिराला समाजबांधवांचा प्रतिसाद: ७ ऑक्टोबर रोजी तुलादान

अकोला: अग्रवाल समाजचे आराध्य महाराजा अग्रसेन यांची जयंती गुरुवार ७ ऑक्टोंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने रविवार ३ ऑक्टोबर रोजी अग्रसेन भवन येथे रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांसह जयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. अग्रवाल समितीचे अध्यक्ष शैलेंद्र (बंटी ) कागलीवाल यांच्या अध्यक्षतेखाली गणेश पूजन सोहळा पार पडला. महाराजा अग्रसेन जयंती उत्सवानिमित्त रविवारी अग्रसेन भवन येथे रक्तदान आणि अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. नितिश अग्रवाल, डॉ. श्रद्धा अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी वेदप्रकाश बंसल, शिवप्रकाश रुहाटीया यांनी स्मृतीचिन्ह प्रदान केले. या प्रसंगी डॉ.सतीश गुप्ता, डॉ. एस. एम. अग्रवाल यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरासोबतच अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले होते. अस्थिरोग तज्ञ डॉ.नितीश अग्रवाल यांनी रुग्णांची तपासणी केली. ७ ऑक्टोबर रोजी महाराजा अग्रसेन जयंती दिना निमित्त समाजातील ८७ वर्षा वरील सेवाभावींसाठी विविध साहित्याने तुलादान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचें संचालन अग्रवाल समितीचे सचिव निकेश गुप्ता यांनी, तर आभार डॉ. जुगल चिरानिया यांनी मानलेत. यावेळी  नवलबाबू भरतीया, पवन गर्ग, अशोक अग्रवाल,बजरंग अग्रवाल,निरंजन अग्रवाल, ॲड. सुरेश अग्रवाल गुरुजी, महिला मंडळ अध्यक्ष ममता अग्रवाल, नवयुवक मंडळाचे अध्यक्ष लव अग्रवाल, वसंत बाछूका, शिवम अग्रवाल, कृष्णा तातिया, रोहित रुंगठा,मनोज अग्रवाल, राजेश अग्रवाल, दिलीप चौधरी, ॲड मनोज अग्रवाल, रोहित केडिया,आशा गोयनका,जगदीश बाछूका,अनिल अग्रवाल, महावीर गाडोदिया, ललित गुप्ता, संतोष अग्रवाल,संध्या अग्रवाल, महेंद्र खेतान, विनोद टोरका, निलेश बोर्डीवाल,पंकज अग्रवाल, संजय टिकूपोते, सुनील अग्रवाल खंडवा, आशिष अग्रवाल,विजय छावछरिया, जगदीश अग्रवाल, ऋतिक अग्रवाल, योगेश गोयल, शुभम अग्रवाल, प्रतुल भारूका, गोपाल टेकडीवाल, संदेश केडिया, कृष्णा पाडिया, ममता अग्रवाल,संतोष केडिया, रूची गुप्ता, मीना कागलीवाल, महावीर गुप्ता, अरविंद अग्रवाल,विजय केडिया, भवन व्यवस्थापक गणेश अग्रवाल समवेत अग्रवाल समिती,अग्रसेन भवन ट्रस्ट, महिला मंडल, नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp Maharaj Agrasen Jayanti celebrations starts at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.