वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:19 AM2021-04-23T04:19:32+5:302021-04-23T04:19:32+5:30
............................ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप अकाेला : अत्यावश्यक सेवेत रुजू असलेले पोलीस कर्मचारी ,पेट्रोल पंप अटेंडंट ,अग्निशमन दल ...
............................
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप
अकाेला : अत्यावश्यक सेवेत रुजू असलेले पोलीस कर्मचारी ,पेट्रोल पंप अटेंडंट ,अग्निशमन दल ,वाहतूक शाखा पोलीस कर्मचारी , विद्युत विभाग, यांना सरबत ,फळे, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप भाजपा पूर्व मंडळ तर्फे करण्यात आले. यावेळी भाजपा पूर्व मंडळाचे सरचिटणीस संदीप गावंडे, आकाश ठाकरे ,अभिजीत कडू , पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष केशव हेडा , महानगर युवा मोर्चा सचिव रुपेश लोहकपुरे , भावेश सोलंकी, आदी उपस्थित हाेते.
............................
सनदी लेखापाल अकोला शाखेच्या वतीने व्याख्यान
अकोला- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अकोला,अहमदनगर व सातारा शाखेच्या संयुक्त विद्यमाने काेरोना महामारीचे संकट बघता सनदी लेखापालांना कोड ऑफ एथिक्स या अभिनव विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमात अकोला शाखाध्यक्ष सीए केयूर देढिया, मुंबईचे सीए चंद्रशेखर वझे यांनी मार्गदर्शन केले. वक्ता परिचय अहमदनगर शाखा अध्यक्ष सीए संदीप देसरडा यांनी दिला. तसेच सातारा शाखा अध्यक्ष सीए जीवन जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. हे ऑनलाईन व्याख्यान संपन्न करण्यासाठी अकोला शाखा अध्यक्ष सीए केयूर देढिया,उपाध्यक्ष सीए हिरेन जोगी,सचिव सीए जलज बाहेती,कार्यकारिणी सदस्य सीए दीपक अग्रवाल,सीए गौरीशंकर मंत्री समवेत अहमदनगर व सातारा शाखा अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य यांनी परिश्रम घेतले अशी माहिती जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सीए रमेश चौधरी यांनी दिली आहे.
............................
कोरोना लसीकरण वार्ड निहाय करा
अकोला : पंतप्रधानांकडून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस द्यायचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करताना वार्ड निहाय लसीकरण केंद्र स्थापन करावे अशी मागणी ग्रामीण युवा संघटना जिल्हाध्यक्ष उमेश इंगळे यांनी केली आहे.
................................................
नागरिकांना मोफत लस देण्यात यावी
अकोला : १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारने त्यांच्या कोट्यातून मोफत लस देण्याची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी भाजपा लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
................................................
बारावीच्या परीक्षेचा निर्णय घ्यावा
अकोला : राज्य शासनाने बारावीच्या परीक्षेचा त्वरित निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे
........................................