जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:17 AM2020-12-24T04:17:44+5:302020-12-24T04:17:44+5:30

अकोला : कोविडकाळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना ...

Blood donation of officers and employees of district administration | जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे रक्तदान

जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे रक्तदान

Next

अकोला : कोविडकाळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी ऑफिसर्स क्लबला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आज जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. शासकीय सेवेत काम करणारे जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी रक्तदान करून जिल्ह्यातील जनतेशी असलेली बांधिलकी जपली.

येथील ऑफिसर्स क्लबमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते. त्यांचे समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, तहसीलदार विजय लोखंडे, ऑफिसर्स क्लबचे सहसचिव रमेशप्रसाद अवस्थी, डॉ. अशोक भोपळे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पापळकर व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सर्व सुदृढ नागरिकांचे कर्तव्य आहे की त्यांनी स्वेच्छेने रक्तदान करावे. याच भावनेने जिल्हा प्रशासनातील अधिकारी रक्तदान करून आपला सेवाभाव व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनीही मनोगत व्यक्त करून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, तहसीलदार विजय लोखंडे या अधिकाऱ्यांनी रक्तदान करून या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर दिवसभर हे शिबिर सुरू होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. आभार रमेशप्रसाद अवस्थी यांनी मानले.

Web Title: Blood donation of officers and employees of district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.