पाेलिस बांधवांनी रक्तदानातून जाेडले प्राणदानाचे नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:15 AM2021-07-15T04:15:09+5:302021-07-15T04:15:09+5:30
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते करण्यात आले़ या वेळी अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, ...
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते करण्यात आले़ या वेळी अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, पाेलिस मुख्यालयाचे राखीव पाेलिस निरीक्षक् श्रीधर गुलसुंदरे प्रमुख उपस्थितीत हाेते़ जिल्हा विशेष शाखेचे मुकुंद कुळकर्णी, जुने शहरचे ठाणेदार महेंद्र देशमुख, आकाेट फैलचे ठाणेदार महेंद्र कदम, डाबकी राेडचे ठाणेदार विजय नाफडे यांच्यासह पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रक्तदान माेहिमेचे काैतुक केले़ पाेलीस मुख्यालयाचे राखीव पाेलीस निरीक्षक श्रीधर गुलसुंदरे यांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या़ पाेलिस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मेस चालकांनाही रक्तदानासाठी पुढाकार घेतला़ रक्तदात्यांचे पुषपगुच्छ, प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले़
रक्तदान करा, सुटी घ्या
दरम्यान, पाेलिस मुख्यालयात आयाेजित रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या पाेलिस बांधवांना त्या दिवसाची सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने अकाेला पाेलिसांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन भरभरून प्रतिसाद दिल्याने हा निर्णय घेण्यात आला असून रक्तदान करणाऱ्या पाेलिसांनीही लाेकमत परिवार तसेच वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांचे आभार मानले़
यांनी दिल्या भेटी
रक्तदान शिबिर सुरू झाल्यानंतर शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेष सपकाळ, वाहतुक शाखेचे प्रमुख गजानन शेळके, दहशतवाद विराेधी कक्षाचे प्रमुख तथा रामदासपेठचे ठाणेदार विलास पाटील यांच्यासह पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन लाेकमतच्या या सामाजिक उपक्रमाचे काैतुक केले़ तसेच हे माध्यमांचे सकारात्मक पाऊल असल्याचेही स्पष्ट केले़