वाहतूक शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:33 AM2020-12-13T04:33:17+5:302020-12-13T04:33:17+5:30
अकाेला : काेराेनाच्या संकटात रक्ताचा तुटवडा निर्माण हाेत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अकाेला वाहतूक ...
अकाेला : काेराेनाच्या संकटात रक्ताचा तुटवडा निर्माण हाेत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अकाेला वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी रक्तदान केले. वाहतूक शाखेच्या कार्यालयात आयाेजित या रक्तदान शिबिरात पाेलिसांच्या कुटुंबीयांनीही रक्तदान केले. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे रक्तसंकलन कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात अभूतपूर्व असा रक्ताचा तुटवडा आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांनी शहर वाहतूक शाखेच्या प्रांगणात रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत उपस्थित होत्या. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. असा उपक्रम जिल्ह्यात राबविणार असल्याचे पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जाहीर केले, विशेष बाब म्हणजे शहरात बंदोबस्त असतानाही वाहतूक कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तात कोणतीही कमतरता न ठेवता जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून एक चांगला संदेश समाजाला दिला. या रक्तदान शिबिरामध्ये सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या समन्वयक शिल्पा तायडे , डॉक्टर डोझी व त्यांची चमू सहभागी झाली होती.