जिल्ह्यात १६८ रक्तदात्यांनी जपले रक्ताचं नातं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:20+5:302021-07-12T04:13:20+5:30
महिलांनी नाेंदविला उत्स्फूर्त प्रतिसाद अकाेला : सहायक कामगार आयुक्त कार्यालय, अकोला, जिल्ह्यातील सर्व अस्थापना मालक, व्यापारी व सर्व बांधकाम ...
महिलांनी नाेंदविला उत्स्फूर्त प्रतिसाद
अकाेला : सहायक कामगार आयुक्त कार्यालय, अकोला, जिल्ह्यातील सर्व अस्थापना मालक, व्यापारी व सर्व बांधकाम कामगार संघटनांच्या पुढाकाराने आयाेजित शिबिरामध्ये ३४ जणांनी रक्ताचं नातं जपले. सहायक कामगार आयुक्त आर. डी. गुल्हाने यांनी रक्तदान करून कृतिशील वस्तुपाठ दिला त्यांच्या पूर्ण वेळ उपस्थित हाेते. या रक्तदान शिबिरात बिल्डिंग कामगार मजूर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण खंडारे, सचिव राजेश चितोडे, उपाध्यक्ष गजानन केंद्रे, नंदू वानखडे, सतीश जंजाळ, संतोश बोदळे, संतोष खंडारे, मायाताई नेमाडे, बोरगावमंजू येथील संकल्प श्रमिक असंघटित कामगार मजूर संघाचे अध्यक्ष नितीन गवई, सचिव मनीषाताई चक्रनारायण, साबीरअली मेहमूदअली, संतोष चक्रनारायण, अशोक बिल्डिंग पेंटर मजूर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, सचिव पंचशील गजघाटे, बिल्डिंग पेंटर, बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम, सचिव विनोद जपसरे, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी असंघटित कामगार विभागाचे अध्यक्ष गणेश चक्रनारायण, सचिव भगवान डोंगरे, कामगार विलांग अध्यक्ष दिनकर निकम, सचिव अमोल तायडे, अकोला इंडस्ट्रियल असोसिएशनचे सचिव नितीन बियाणी, श्रमिक महिला मोलकरीण संघाचे जिल्हाध्यक्ष कल्पना सूर्यवंशी, शीला तोरणे, जयमाला रायबोले, रेखा गेडाम, उज्ज्वला तायडे, अनुराधा ढिसाळे, सुनीता पवार, बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, रधुनाथ रायबोले, उद्धव ढेसाळे, भास्कर सोनवणे, मौजस डोंगरदिवे, बन्सीलाल तायडे, विनोद नेमाडे, राधेश्याम यावलकर, गजानन लोखंडे, विठ्ठल घाटोळकर, संजय राऊत, अनिल येलकर, विनोद पवार, रवींद्र गेडाम आदी उपस्थित होते.
———————
या संघटनांनी घेतला पुढाकार !
रक्तदान शिबिरात बिल्डिंग कामगार मजूर असोसिएशन, बोरगावमंजू येथील संकल्प श्रमिक असंघटित कामगार मजूर संघ, अशोक बिल्डिंग पेंटर मजूर असोसिएशन, बिल्डिंग पेंटर, बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी असंघटित कामगार विभाग, कामगार विलांग अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रियल असोसिएशन, श्रमिक महिला मोलकरीण संघ, बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशन यांनी पुढाकार घेतला.