गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2016 12:34 AM2016-06-24T00:34:24+5:302016-06-24T00:34:24+5:30

‘क्राइम मिटिंग’मध्ये एसपी कडाडले; वाहतूक शाखेनेही कारवाया वाढवाव्यात.

Blow the criminals! | गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा!

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा!

Next

अकोला: आगामी काळात होणारे धार्मिक सण, उत्सव व महापालिका निवडणुकीच्या पूर्वी शहरासह जिल्हय़ातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा व त्यांच्यावर तडीपारीसारख्या कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी गुरुवारी क्राइम मिटिंगमध्ये जिल्हय़ातील पोलीस अधिकार्‍यांना दिले. यासोबतच वाहतूक शाखेनेही कारवाई वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगत त्यांच्यावर ताशेरे ओढल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी जिल्हय़ातील पोलीस अधिकार्‍यांची क्राइम मिटिंग घेण्यात आली. जिल्हय़ातील गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच गुंडगिरीमध्ये स्वत:ला हीरो समजणार्‍यांच्या नांग्या ठेचून त्यांना रोखण्यासाठी न्यायालयातील प्रकरणांमध्ये शिक्षेचे प्रमाण आणखी वाढविणे आवश्यक असून त्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दिले. महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असून या निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीपूर्वी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गुंडांना तडीपार करण्यासाठी जास्तीत-जास्त प्रस्ताव सादर करा, धार्मिक सण, उत्सवामध्ये सलोख्याचे वातावरण राहावे यासाठी पोलिसांनी ह्यऑन रोड पोलिसिंगह्णवर भर द्यावा, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले. यासोबतच वाहतूक शाखेने जड वाहनांसोबतच सर्व वाहनांवर व बेताल ऑटोंवर कारवाई करण्याचे आदेशही या मिटिंगमध्ये देण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या क्राइम मिटिंगला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, गृह शाखेचे उपअधीक्षक अरविंद पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्यासह आकोट, बाळापूर व मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार उपस्थित होते. करीत आहेत.

Web Title: Blow the criminals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.