हॉकीसाठी अकोल्यात होणार ब्ल्यू टर्फ मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:47 PM2018-09-02T12:47:00+5:302018-09-02T12:49:44+5:30
अकोला: हॉकीसाठी राज्यातील दुसरे ब्ल्यू टर्फ मैदान अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणार आहे. भारतीय खेल प्राधिकरणाने यासाठीची मोजणी शुक्रवारी केली. हे मैदान राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे.
अकोला: हॉकीसाठी राज्यातील दुसरे ब्ल्यू टर्फ मैदान अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणार आहे. भारतीय खेल प्राधिकरणाने यासाठीची मोजणी शुक्रवारी केली. हे मैदान राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विद्यापीठातील विभागनिहाय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या खेळांना सर्वच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच अनुषंगाने राष्टÑीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून भारतीय खेल प्राधिकरण (साई) औरंगाबाद व मुंबईचे संचालक बुधवार, २९ आॅगस्ट रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. विलास भाले आणि हॉकीअकोलाचे अध्यक्ष डॉ. अभय पाटील आणि सचिव धीरज चव्हाण यांनी हॉकीसाठी टर्फ मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर भंडारकर यांनी दोन दिवसातच मुंबई येथील संदीप संघराजका यांना अकोल्यात पाठविले. शुक्रवारी संघराजका यांनी कृषी विद्यापीठातील हॉकी मैदानाची पाहणी करून मोजमाप केली.
नागपूरचा होता प्रस्ताव
हॉकी मैदानात ब्ल्यू टर्फ बसविण्यासाठी यापूर्वी नागपूरमधून भारतीय खेल प्राधिकरणला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे; मात्र अकोल्यातील प्रस्तावला गती मिळाल्याने लवकरच येथील हॉकी मैदानाचे काम पूर्ण होणार असल्याचे हॉकी अकोलातर्फे सांगण्यात येत आहे.
आमच्याकडे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने येथे हॉकीचे ब्ल्यू टर्फ मैदान उपलब्ध होत असेल तर उत्तमच आहे.
-डॉ. विलास भाले
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,
अकोला.