गंगा नदीच्या पात्रात मृतदेह वाहिले; भाजपचा ढाेंगी चेहरा उघडा पडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:52+5:302021-08-22T04:22:52+5:30
स्थानिक स्वराज्य भवनमध्ये जिल्हा व महानगर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात, महिला व बाल कल्याण मंत्री यशाेमती ठाकूर ...
स्थानिक स्वराज्य भवनमध्ये जिल्हा व महानगर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात, महिला व बाल कल्याण मंत्री यशाेमती ठाकूर यांच्या सत्काराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी मंत्री थाेरात यांनी त्यांच्या खास शैलीत विराेधी पक्ष भाजपचा खरपूस समाचार घेतला. राज्यात महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरळीत सुरू असल्याने विराेधकांची पाेटदुखी वाढली आहे. सत्तेच्या हव्यासाने पछाडलेल्या विराेधकांकडून आघाडी सरकारला धाेका असल्याच्या वावड्या उठविल्या जातात. त्यामध्ये कवडीचेही तथ्य नसल्याचे महसूलमंत्री थाेरात यांनी सांगितले. आघाडी सरकारचे शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचे धाेरण आहे. तीनही पक्षांनी समाजवादी तत्त्वज्ञानाचा स्वीकार केल्यामुळेच आघाडीत काेणतेही भेदभाव नाहीत. पुराच्या संकटात दिलासा देण्यासाठी सरकारने साडेअकराशे काेटींची मदत दिली असून, त्यापूर्वीही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याचे महसूलमंत्री थाेरात यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, पक्ष निरीक्षक झिया पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, अनंतराव बगाडे, चंद्रकांत सावजी, साजिद खान पठाण, प्रा. संजय बोडखे, हेमंत देशमुख, रमाकांत खेतान, मदन भरगड, प्रकाश तायडे, प्रदीप वखारिया, मोहम्मद बदरूजमा, निखिलेश दिवेकर, सुधीर ढोणे, डॉ. संजीवनी बिहाडे, महेश गनगने, आदी उपस्थित हाेते. यावेळी माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी यांनी विचार व्यक्त केले. संचालन कपिल रावदेव यांनी केले.
मुख्यमंत्र्यांना पसंती म्हणजे आघाडीला पसंती!
उद्धव ठाकरे देशातील सर्वाधिक पसंतीचे मुख्यमंत्री ठरत आहेत. त्यांना पसंती म्हणजेच जनतेची महाविकास आघाडी सरकारला पसंती असल्याचे बाळासाहेब थाेरात म्हणाले. यापूर्वी राज्यात फडणवीस नव्हे, तर फसणवीस सरकार हाेते. केंद्र सरकार लोकशाही मोडीत काढण्याचे पाप करीत असून, देश एकसंध ठेवण्यासाठी काँग्रेसला बळ द्या, आपसांतील मतभेद मिटवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
संघटनेची ताकद मतपेटीत दाखवा!
पक्षाच्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसते. संघटना मजबूत करताना नेमकं चुकते कुठे, यावरही चिंतन केले पाहिजे. संघटनेची ताकद आगामी मनपा निवडणुकीच्या मतपेटीत दाखवा, असे आवाहन बाळासाहेब थाेरात यांनी केले.