खापरवाडा येथील वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:21 AM2021-09-11T04:21:17+5:302021-09-11T04:21:17+5:30
यासंदर्भात सविस्तर असे की, तालुक्यातील खापरवाडा येथील युवक नंदकिशोर तुळशीराम टापरे (वय २५) हा ९ सप्टेंबरला सकाळी बैल चारण्यासाठी ...
यासंदर्भात सविस्तर असे की, तालुक्यातील खापरवाडा येथील युवक नंदकिशोर तुळशीराम टापरे (वय २५) हा ९ सप्टेंबरला सकाळी बैल चारण्यासाठी शेतात गेला होता, बैल चारून घरी परत येत असताना गावालगत असलेल्या नदीला पूर होता. तासनतास नदी तीरावर अडकलेल्या नंदकिशोर याचा अचानक पाय घसरून तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. तेव्हापासून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन महसूल प्रशासनासह नागपूर येथील शासकीय शोध व बचाव पथक (एनडीआरएफ) यांनी शर्तीचे प्रयत्न करून शुक्रवारी मृतदेह शोधून काढला. गुरुवारी उमा नदीच्या पुरात वाहून गेलेला नंदकिशोर हा आई-वडिलांना एकुलता मुलगा होता. दोन एकर शेती असलेल्या तुळशीराम टापरे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. शोधमोहिमेत माना पोलिसांची महत्त्वाची कामगिरी राहिली असून, पुढील तपास ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल देवानंद दंदी, पोलीस शिपाई जय मंडावरे अधिक तपास करीत आहेत.
---------------
यांनी राबविली शोधमोहीम
नंदकिशोर याचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद पथक नागपूर येथील एक पथक समादेशक तथा नियंत्रण अधिकारी पंकज डहाणे यांच्या नियंत्रणाखाली सहायक समादेशक प्रमोद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय उद्धव केंद्रे व पीएसआय मधुकर मोरला यांच्यासोबत एकूण १८ पोलीस अंमलदार चालकांचा समावेश आहे. बचाव पथकातील किरण डेकाटे, विलास डोंगरे, सुधीर शिरसाठ, कमलेश समरीत, कुणाल हिवरकर, दीपक कुलाळ, पवण धुळे, पंकज गवई, टोपेद्र ढोमने, ओम शेंडे, संभाजी इंगळे, नियाज खान, रोहिदास पाटील, बाजीराव गर्जे, देविदास जाधव, सुशील धोटे, शरद जूनघरे, मुडेजी शोध घेण्याकरिता घटनास्थळी दाखल झाले होते. बचाव पथकाने निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर अभयसिंह मोहिते, तहसीलदार प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबविण्यात आली.