गणेश विसर्जनादरम्यान बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 07:49 PM2017-09-07T19:49:33+5:302017-09-07T19:49:58+5:30
कोठारी: गणेश विसर्जन करताना कोठारी येथील युवक श्रीकृष्ण ऊर्फ बंडू जामकर हा मालेगाव तालु क्यातील पांगराबंदी गावाजवळील खदानीत ४ सप्टेंबर रोजी बुडाला होता. ७ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृ तदेह सापडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी: गणेश विसर्जन करताना कोठारी येथील युवक श्रीकृष्ण ऊर्फ बंडू जामकर हा मालेगाव तालु क्यातील पांगराबंदी गावाजवळील खदानीत ४ सप्टेंबर रोजी बुडाला होता. ७ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृ तदेह सापडला.
कोठारी येथील श्रीकृष्ण ऊर्फ बंडू जामकर हा मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी गावाजवळ धरणाचे काम सुरू असताना तयार झालेल्या खदानीत गणेश विसर्जन करण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला होता. कोठारी येथील मृतकाच्या कुटुंबीयाने दिलेल्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती; मात्र सदर घटनास्थळ मालेगाव तालुक्यात येत असल्याने हे प्रकरण मालेगाव पोलिसांकडे देण्यात आले होते. दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी सकाळी युवकाचा मृतदेह खदानीमध्ये पाण्यावर तरंगलेला नातेवाइकांना दिसून आला. याविषयी माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. मालेगाव ये थील पोलीस उपनिरीक्षक जमदाडे यांच्यासह पोहेकॉ. नारायण वाघ, खंडारे, नीलेश इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील डॉक्टरांना पाचारण केले. यावेळी तलाठी घुगे यांची उपस्थिती होते. मृतकाच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. लहान मुलगी केवळ पंधरा दिवसांची असल्याने अशावेळी पित्याचे छत्र हरवल्यामुळे परिसरासह गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.