अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:21 IST2020-11-18T19:21:03+5:302020-11-18T19:21:09+5:30
मृताचे नाव मनदीप असून, तो राजस्थानमधील जि. झुणझुण येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय!
पातूर: पातूर-वाशिम महामार्गावर असलेल्या राजस्थान धाबा येथे बुधवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल्यानंतर घातपात असल्याची शक्यता वर्तविली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पातूर-वाशिम महामार्गावर असलेल्या रामदेव रायका राजस्थान धाब्यानजीक एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. मृताचे नाव मनदीप असून, तो राजस्थानमधील जि. झुणझुण येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. यावेळी पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला असून, पुढील तपास पातूर पोलीस करत आहेत.