‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:58+5:302021-09-02T04:41:58+5:30
रेल्वे स्टेशन परिसरात एक अनोळखी व्यक्ती रेल्वेखाली आल्याने त्याचा दि. ३० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त ...
रेल्वे स्टेशन परिसरात एक अनोळखी व्यक्ती रेल्वेखाली आल्याने त्याचा दि. ३० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या आधारे नातेवाइकांनी चौकशी केली असता, मृतक व्यक्तीचे नाव आनंदा रूपराव एरडावकर (४६) असून, तो चिखली गेट येथील रहिवासी आहे. तो दि. २९ तारखेपासून घरून निघून गेला होता. नातेवाइकांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला असता, मृतदेहाची ओळख पटली, मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. अधिक तपास तपास अधिकारी राजेंद्र जळमकर करीत आहे.
---------------------
मूर्तिजापूरात १६ किलो गांजा जप्त; दहशदवाद विरोधी पथकाची कारवाई
मूर्तिजापूर : अमरावतीवरून मूर्तिजापूर शहरात गांजा विक्रीसाठी आलेला १६ किलो गांजा दहशदवाद विरोधी पथकाने हस्तगत केला. राष्ट्रीय महामार्गावर १ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
अमरावती येथून ऑटो रिक्षातून गांज्याची वाहतूक करताना ऑटो रिक्षासह तब्बल १६ किलो गांजा असा ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अकोला दहशतवादी पथकाने जप्त केला आहे. बुधवारी १ सप्टेंबर रोजी दहशतवाद विरोधी पथक हे मूर्तिजापूर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीवरून मूर्तिजापूर येथे गांजा विक्री करण्यासाठी ऑटोरिक्षा क्रमांक एम एच २७ बी डब्ल्यू ५१७१ मध्ये आणत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून अमरावती मूर्तिजापूर बायपासवर कारंजा टी पॉइंट येथे नाकाबंदी करून ऑटो रिक्षाची तपासणी कली असता, समोरील शीटखाली गांजा भरलेली प्लास्टीक पिशवी दिसून आली. या प्रकरणी चालक शेख आसिफ शेख युसूफ (२९) रा.रहमतनगर अमरावती याला ताब्यात घेण्यात आले. १ लाख ६० हजार किमतीचा गांजा व ऑटोरिक्षा किंमत २ लाख रुपये व एक मोबाइल किमत १० हजार रुपये असा ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.