काटेपुर्णा नदीत बुडालेल्या महिलेचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:20 AM2021-04-01T04:20:03+5:302021-04-01T04:20:03+5:30
पिंजर : काटेपुर्णा नदीच्या डोहात पोहताना महिला बुडाली हाेती. या महिलेचा मृतदेह बुधवारी सापडला. संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व ...
पिंजर : काटेपुर्णा नदीच्या डोहात पोहताना महिला बुडाली हाेती. या महिलेचा मृतदेह बुधवारी सापडला. संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी हे सर्च ऑपरेशन राबविले.
वाशीममधील मालेगाव तालुक्याच्या वाकलवाडी येथील रत्नामाला जानकीराम मेटांगे (४५) ही २९ मार्च रोजी दोनद खु. येथे एका कार्यक्रमासाठी आली असता, अन्य एका महिलेसाेबत दुपारी आसरा माता मंदिराला लागूनच असलेल्या काटेपुर्णा नदीच्या डोहात पोहण्यास गेली. यावेळी पाेहताना ती बुडाली. या प्रकरणाची माहिती पिंजर पोलीस स्थानकाचे ठाणेदार महादेव पडघान यांनी संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना देत तत्काळ सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले होते. २९ मार्च रोजी दिवसभर दोनद खु. आणि दोनद बु. येथील ग्रामस्थ आणि संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे सदस्य महिलेचा शोध घेत होते. मंगळवार, ३० मार्च रोजी दिवसभर संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी काल रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता, महिलेचा मृतदेह सापडला नाही. अखेर ३१ मार्च रोजी सकाळी ११.४५ वाजता रत्नामाला हिचा मृतदेह फुगून वर आला. याप्रकरणी ठाणेदार महादेव पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली बी. ज. महादेव सोळंके हे पुढील तपास करत आहेत.
...........