बोगस डिग्रीप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: June 9, 2017 03:57 AM2017-06-09T03:57:56+5:302017-06-09T03:57:56+5:30
वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरून नारायण भोरे याच्यावर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : शहरातील सराफा लाइनमध्ये बोगस पदवीच्याआधारे रुग्णालय चालवणाऱ्या डॉ. नारायण भोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य विभागाद्वारा बोगस डिग्रीच्या आधारे दवाखाने थाटून रुग्णांच्या जीवित्वाशी खेळणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटल आणि दवाखाने तपासणी करून यामध्ये सुविधांची पूर्तता करण्यात येते किंवा नाही, याचा अहवाल मागवून कार्यवाही करण्यात येत आहे.
मूर्तिजापूर शहरात बऱ्याच हॉस्पिटलमध्ये बॉम्बे नर्सिंग अॅक्टची सर्रास पायमल्ली करण्यात येत असल्याचा प्रकार तपासणीदरम्यान उघड झाला. शहरातील ४ ते ५ हॉस्पिटल सात दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश देऊन त्रुटीची पूर्तता करण्याचे बजावण्यात आले आहे.
स्थानिक स्टेशन विभागात सराफ लाइनमध्ये आरोग्य क्लिनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्टिल चालविणारे डॉ. नारायण भोरे यांची डिग्री बोगस असल्यावरून वरिष्ठांच्या आदेशावरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक मोहीम राबविणाऱ्या पथकाला डॉ. नारायण भोरे यांची डिग्री बोगस असल्यावरून वरिष्ठांच्या आदेशावरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडक मोहीम राबविणाऱ्या पथकाला डॉ. नारायण भोरे यांच्या दर्शनीय बोर्डावर (फलक) एमबीबीएस (बीआयओ) अशी डिग्री (पदवी) लिहिण्यात आल्याचे दिसून आले. सदर डॉ. भोरे यांच्याकडे बीएचएमएस ही पदवी आहे. त्यामुळे त्यांनी एमबीबीएस (बीआयओ) अशी डिग्री दाखवून रुग्णांची दिशाभूल करून फसवणूक केली व बोगस डिग्रीचा उपयोग केला. या प्रकरणाचा अहवाल वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेमाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठविला होता. त्यांनी तो अहवाल जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत ठेवला. सदर डॉक्टर यांची डिग्री संशयास्पद असल्याने त्यांच्याविरुद्ध वरिष्ठांचे फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश प्राप्त झाल्यावर वैद्यकीय अधीक्षक यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून ६ जून रोजी कलम ४२०, सहकलम ३३, मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.