बोगस पासपोर्ट, अविवाहित भासवून महिला डॉक्टरचे इंग्लडमध्ये पलायन; पासपाेर्ट कार्यालय व व्हीजा अथाेरिटीची केली फसवणूक
By सचिन राऊत | Published: May 8, 2024 09:53 PM2024-05-08T21:53:46+5:302024-05-08T21:53:46+5:30
खदान पाेलिस ठाण्यात तीच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकाेला : गाैरक्षण राेडवरील रहिवासी डाॅ. श्रीतीका सुनील सुरेका बगडीया हीने विवाहीत असतांना अविवाहीत दाखवून स्वताचे नाव, पत्ता, व पासपाेर्टसाठी लागणारी सर्व माहीती बनावट देऊन अकाेल्यातून इंग्लडमध्ये पळून गेल्याची घटना सप्टेंबर २०२१ ते २०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणी खदान पाेलिस ठाण्यात तीच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमानखा प्लाॅट सिव्हील लाइन्स परिसरातील रहीवासी डाॅ. अनुपकुमार मधुसुधन बगडीया यांनी खदान पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डाॅ. श्रीतिका सुनील सुरेका बगडीया रा. गाैरक्षण राेड हीने विवाहीत असतांनासुध्दा अविवाहीत असल्याचे दाखवून, स्वताचे नाव, राहण्याचा पत्ता बदललेला असतांनासुध्दा ती सर्व खरी माहीती लपवून तसेच अविवाहीत असल्याची खाेटी माहीती पासपाेर्ट कार्यालयास दिली. त्यानंतर दुसरे नाव वापरुन पासपाेर्ट प्राप्त केला. त्यानंतर याच पासपाेर्टच्या आधारे अविवाहीत असल्याचे दाखवुन व्हीजा प्राप्त केला. काही कालावधी गेल्यानंतर पासपाेर्ट कार्यालय, व्हीजा अथाेरिटी यांची फसवणुक करून इंग्लडमध्ये पळून गेली.
हा प्रकार पासपाेर्ट कार्यालय, व्हीजा अथाेरिटी व पाेलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी तक्रारीनुसार डाॅ. श्रीतिका सुनील सुरेका बगडीया रा. गाैरक्षण राेड हीच्याविरुध्द खदान पाेलिस ठाण्यात पासपाेर्ट अधीनीयम कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खदान पाेलिस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.