अकोट तालुक्यात ७५ हजार रूपयांचे बोगस बियाणे जप्त, दोन विक्रेत्यांविरूद्ध गुन्हा
By Atul.jaiswal | Published: May 30, 2024 03:15 PM2024-05-30T15:15:07+5:302024-05-30T15:17:05+5:30
दोन विक्रेत्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल जयस्वाल, अकोला : कृषी निविष्ठांच्या विक्रीत कुठेही गैरव्यवहार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासण्यांना वेग देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने अकोट तालुक्यातील उमरा येथे बुधवारी टाकलेल्या छाप्यात ७५ हजार रूपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. या पथकाने् केलेल्या मंगळवारी व बुधवारी केलेल्या दोन कारवायांत दोषी आढळलेल्या दोन विक्रेत्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस बियाणे जप्त
अकोट तालुक्यातील उमरा येथील निर्मल दिलीपसिंग तोमर (ठाकूर ) यांच्या शेतातील मोडकळीस आलेल्या घरात बोगस बियाणे असल्याबाबत गुप्त खबर जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी बुधवारी (२० मे) दुपारी. चार वाजताच्या सुमारास मोहीम अधिकारी महेंद्रकुमार साल्के, ,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतिशकुमार दांडगे, कृषी अधिकारी भरत चव्हाण व अकोट ग्रामीण पोलीसांच्या पथकाने छापा टाकला. त्यात बोगस कापुस बियाण्याची ७५ हजार २०० रू. ची एकुण ४७ पाकिटे जप्त करण्यात आली.
निर्मल तोमर (ठाकूर ) रा .उमरा ता .अकोट यांच्या विरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.