बाखराबाद हत्याकांडाचा निकाल मंगळवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 06:42 PM2018-11-17T18:42:52+5:302018-11-17T18:42:55+5:30

अकोला: बाखराबाद येथील एका परिवारातील चौघांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी असलेल्या दोन मुले व बापास दोषी ठरविल्यानंतर या खटल्याची शनिवारी अंतीम सुनावणी होती मात्र न्यायालयाने ती आता मंगळवारी ठेवली आहे.

Bokharbad murder case verdict on Tuesday | बाखराबाद हत्याकांडाचा निकाल मंगळवारी

बाखराबाद हत्याकांडाचा निकाल मंगळवारी

Next


अकोला: बाखराबाद येथील एका परिवारातील चौघांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी असलेल्या दोन मुले व बापास दोषी ठरविल्यानंतर या खटल्याची शनिवारी अंतीम सुनावणी होती मात्र न्यायालयाने ती आता मंगळवारी ठेवली आहे.
उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाखराबाद येथे १४ एप्रिल २०१४ रोजी २ एकर शेतजमिनीच्या वादातून आरोपी गजानन वासुदेव माळी व त्यांची दोन मुले नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी यांनी विश्वनाथ माळी, वनमाला माळी, योगेश माळी व राजेश माळी यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवित त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी गजानन वासुदेव माळी, नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ४५२, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. उरळ पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात झाली असून, त्यांच्या न्यायालयाने तीनही आरोपींना ३०२ आणि २०१ अन्वये दोषी ठरविले आहे. तर अंतिम निकाल मंगळवारी लागणार आहे.

Web Title: Bokharbad murder case verdict on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.