पाच हजारांवर पालकांनी केली पुस्तके परत, आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:19 AM2021-05-13T04:19:06+5:302021-05-13T04:19:06+5:30

मागील वर्षी संच वाटप- १६०८७१ यावर्षी मागणी- १,३८००० गतवर्षी विद्यार्थ्यांना दिलेली पाठ्यपुस्तके इ. १ ली- १३,९०७ इ. २ री- ...

Books returned by over five thousand parents, when will you do it? | पाच हजारांवर पालकांनी केली पुस्तके परत, आपण कधी करणार?

पाच हजारांवर पालकांनी केली पुस्तके परत, आपण कधी करणार?

Next

मागील वर्षी संच वाटप- १६०८७१

यावर्षी मागणी- १,३८०००

गतवर्षी विद्यार्थ्यांना दिलेली पाठ्यपुस्तके

इ. १ ली- १३,९०७

इ. २ री- १४,३९०

इ. ३ री- १४,९५६

इ. ४ थी- १५,६५३

इ. ५ वी- १९,०८९

इ. ६ वी- १९,३४४

इ. ७ वी- २०,४३६

इ. ८ वी- २०,४३६

पर्यावरण संवर्धन आणि कागदाची बचत करण्याच्या दृष्टीने गतवर्षी दिलेल्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी गतवर्षी वापरलेली पुस्तके पालक शाळांमध्ये आणून देत आहेत. ही पाठ्यपुस्तके इतर गरीब विद्यार्थ्यांच्या कामात पडतील. ज्या पालकांनी अद्यापही पुस्तके जमा केली नसतील, त्यांनी तातडीने शाळेकडे पुस्तके जमा करावी.

-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक

शिक्षण विभागाच्या आवाहनाला पालक, विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत पाच हजार पालकांनी शाळेत पुस्तके परत आणून दिली. विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके संकलित करून पुनर्वापर करण्यात येणार आहे. वापरलेली पुस्तके इतर विद्यार्थ्यांच्या कामी पडतील. यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.

- नंदकिशोर लहाने, सहायक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान

पालकांसह मुख्याध्यापकांनी घेतला पुढाकार

शिक्षण विभागाच्या आवाहनानंतर मुख्याध्यापकांकडे पालक, विद्यार्थ्यांना मोफत दिलेली पाठ्यपुस्तके शाळेत पुन्हा परत आणून देण्याच्या सूचना दिल्या. त्याला पालकांनी प्रतिसाद दिला. गत दहा-बारा दिवसांमध्ये पालकांनी सर्वच वर्गांची पुस्तके शाळेत आणून दिली आहेत. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पालकांसोबतच विद्यार्थीही जागरूक होत असल्याने, ते पुस्तक पुनर्वापर प्रकल्पास हातभार लावत आहेत.

Web Title: Books returned by over five thousand parents, when will you do it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.