वाचुन झालेली पुस्तके ग्रंथलयात दान करावी - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:09 PM2018-09-30T17:09:31+5:302018-09-30T17:14:34+5:30

अकोला- वाचन संस्कृती समृध्द करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या यथा शक्ती पुस्तके वाचनालयात दान करावी. असा संकल्प करावा असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. 

 Books should be donated in the liabrary - Dr. Ranjit Patil | वाचुन झालेली पुस्तके ग्रंथलयात दान करावी - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

वाचुन झालेली पुस्तके ग्रंथलयात दान करावी - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

Next
ठळक मुद्दे ई-लायब्रीरच्या इमारतीचे लोकार्पण गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे या होत्या. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज असे ई-लायब्ररी सुरू करावी अशी मागणी आमदार बाजोरीया यांनी केली.

अकोला- वाचन संस्कृती समृध्द करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या यथा शक्ती पुस्तके वाचनालयात दान करावी. असा संकल्प करावा असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.  आपण जे बघतो, जे वाचतो तेच आत्मसात करतो. हे आत्मसात केलेले ज्ञान आपले जीवनात बदल घडविण्यासाठी उपयोगी पडते. यामुळे विदयार्थ्यांच्या सोईसाठी व त्यांना ज्ञान प्राप्त होण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणुन ई-लायब्ररी साठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्य पुर्ण योजनेतुन निधी उपलब्ध करुन दिला, ज्ञान हे वाघीणीचे दुध असुन ग्रंथ वाचनाने मानवाला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते. कोणतीही गोष्ट रद्दी होत नाही म्हणुन आपल्याकडील वाचुन झालेली पुस्तके ग्रंथलयात दान करावी. असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने 1 कोटी 81 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तीन मजली अध्यावत नविन विस्तारीत ई-लायब्रीरच्या इमारतीचे लोकार्पण गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे या होत्या. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज असे ई-लायब्ररी सुरू करावी अशी मागणी आमदार बाजोरीया यांनी केली. व ई-लायब्ररीचा लाभ घेण्याची युवकांना आवाहन केले.
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी या लायब्ररीचा फायदा होईल असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या वाघोडे यांनी सांगीतले. े प्रास्ताविक अमरावती येथील शासकीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल राजेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बाळकृष्ण बिडवाईक यांनी केले. यावेळी सिंधु सिनीअर सिटीजन असोशिएशनेचे अध्यक्ष ग्यानचंद वाधवानी यांनी शंभर पुस्तके भेट दिली.
या कार्यक्रमाला माजी आमदार जगन्नाथ् ढोणे , नारायण गव्हाणकर, माजी महापौर उज्वलाताई देशमुख , नगरसेवक हरिश अलिमचंदाणी , गोपी ठाकरे , आशिष पवित्रकार, अमरावती विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक जगदिश पाटील , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एमआर चव्हाण, अमरावतीचे ग्रंथालय अधिकारी दिपक गेडाम, ?ड.मोतीसिंग मोहता, डॉ.अशोक ओळंबे, सत्यनारायण बाहेती, सनातन वाचनालयाचे श्रीकिसनजी अग्रवाल यांच्यासह ग्रंथालय विभागाचे अधिकारी कर्मचारी विविध वाचनालयाचे पदाधिकारी, स्पर्धा परिक्षेचे विदयार्थी यांची उपस्थिती होती.

 

Web Title:  Books should be donated in the liabrary - Dr. Ranjit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.