महिलांचे दारूबंदीसाठी बोरगावात शक्ति प्रदर्शन
By admin | Published: July 10, 2017 02:17 AM2017-07-10T02:17:42+5:302017-07-10T02:17:42+5:30
स्वाक्षरी पडताळणीला १४२९ महिला हजर
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू शहरातील कार्यरत देशी दारू दुकाने, बियर शॉपी, वाईन बार, मद्यविक्री कायमस्वरूपी बंद करण्याबाबत महिला दारुबंदी संघर्ष समितीने २९ जून रोजी जिल्हाधिकारी, अधीक्षक दारू उत्पादन शुल्क, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना एका निवेदन देऊन दारुबंदीकरिता निवडणूक घेण्याची मागणी केली होती. दरम्यान प्राप्त महिलांच्या निवेदनानुसार कार्यवाहीबाबत जिल्हा प्रशासनाने गावातील महिला मतदारांच्या एकूण २५ टक्केपेक्षा जास्त त्यांच्या तक्रारी अर्जावरील स्वाक्षऱ्या पडताळणी अनिवार्य असल्याने प्रशासनाने रविवारी येथील प. नाईक विद्यालयात स्वाक्षऱ्या पडताळणी करण्यात आली असून एकूण १४२९ महिलांनी आज सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत एकच झुंबड करून एकूण १४२९ महिलांनी आपल्या सह्यांची पडताळणी केली. दरम्यान संबंधितांनी त्वरित दारुबंदीकरिता निवडणुकीची मागणी केली.
आज सकाळपासून पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, दारू उत्पादन शुल्क विभाग आदी अधिकारी व कर्मचारी यांनी हजेरी लावून प्रत्यक्ष स्वाक्षऱ्या पडताळणीचे काम केले तर दारुबंदी महिला संघर्ष समिती महिला व पुरुष यांनी प्रत्येक महिलांचा प्रत्यक्ष भेटी देऊन प्रसार व प्रचार केल्याने स्वाक्षरीच्या प्राप्त झालेल्या निवेदनावरील एकूण स्वाक्षऱ्यांच्या २५ टक्के महिला मतदारांची स्वाक्षरी पडताळणी करण्याची गरज ोती तर १४२९ महिलांच्या स्वाक्षरीची पडताळणी करण्यात आली. त्यामुळे आता जिल्हाप्रशासनाने त्वरित निवडणूक घ्यावी व आम्हा महिलांना न्याय द्यावा, असे बोरगाव मंजू शहरातील महिलांनी प्रशानाला साकडे घातले आहे. दरम्यान सकाळपासूनच येथील महिलांनी पडताळणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करून कायमचीच दारू बंद करण्याची मागणी केली आहे, हे विशेष.